Join us  

India Tour of Ireland: सर्व खेळाडू आयर्लंड मालिकेसाठी पोहोचले, पण कॅप्टन हार्दिक पांड्या 'नॉट रिचेबल'; जाणून घ्या नेमकं कारण 

India Tour of Ireland: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यासाठी सराव करतोय, तर दुसरा संघ आयर्लंड दौऱ्यावर होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 3:31 PM

Open in App

India Tour of Ireland: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यासाठी सराव करतोय, तर दुसरा संघ आयर्लंड दौऱ्यावर होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी दाखल झाला आहे. दिनेश कार्तिकने गुरुवारी एक फोटो पोस्ट करून डबलीनला पोहोचल्याचे सांगितले. या फोटोत कार्तिकसह, दीपक हुडा, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल व अर्षदीप सिंग दिसत आहेत. हर्षल पटेलही इथे पोहोचला आहे. पण, कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) अजूनही आयर्लंडला पोहोचला नसल्याची माहिती समोर येत आहे.   VVS लक्ष्मण या दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक असणार आहे. २६ व २८ जूनला या लढती होणार आहेत. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटनने नुकतेच आयपीएल २०२२ चे जेतेपद पटकावले आहे. आयपीएल २०२२ मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. संजूचे पुनरागमन झाले आहे. पण, हार्दिक अद्याप पोहोचलेला नाही. आयपीएलनंतर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिक खेळला होता. १९ जूनला ही मालिका संपली, त्यानंतर हार्दिक काही दिवसांसाठी कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. 

भारतीय संघ - हार्दिक पांड्या ( कर्णधार), भुवनेश्वर कुमार( उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सुर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उमरान मलिक.  हार्दिक हा आज मुख्य प्रशिक्षक व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्यासोबत आयर्लंड येथे दाखल होणार आहे. दरम्यान, भारत-आयर्लंड सामन्यांवर  बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याचीही नजर असणार आहे. ही मालिका पाहण्यासाठी गांगुलीही येणार असल्याचे सांगण्यात येतेय.   

टॅग्स :हार्दिक पांड्याआयर्लंडभारत
Open in App