India Tour of West Indies : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI आणि निवड समिती टीम इंडियातील सीनियर खेळाडूंवर नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष करून विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या या चार खेळाडूंवर बीसीसीआय नाराज असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध बीसीसीआयने कालच वन डे संघ जाहीर केला. त्यात विराट, रोहित आदींना विश्रांती दिली गेली आहे आणि त्यानंतरच बीसीसीआय नाराज असल्याचे वृत्त समोर आले.
विश्रांती घेतल्याने फॉर्म परत येत नाही; विराट कोहली व रोहित शर्माला आराम दिल्याने इरफान पठाण भडकला
एक मालिका खेळले नाही की हे सीनियर खेळाडू विश्रांतीची मागणी करत असल्याचा आरोप बीसीसीआयच्या सूत्रांनी TOI ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ''निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत वर्कलोड व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित होतो. रोहित, कोहली, पांड्या, बुमराह आणि शमी हे खेळाडू नेहमीच विश्रांतीची गरज असल्याचे सांगतात. या खेळाडूंना विश्रांती मिळावी यासाठी नेहमीच प्राधान्यही दिलं जातं. ट्रेनर आणि फिजिओ संघ व्यवस्थापनाच्या हाती या खेळाडूंना विश्रांतीची गरज असल्याचे नोट पाठवतात,''असे सूत्रांनी सांगितले.
BCCI ने भारतीय संघामध्ये कर्णधारांची भरवलीय 'जत्रा'; १० महिन्यांत ८ जणांकडे सोपवलं नेतृत्व!
त्यामुळेच एक मालिका झाल्यानंतर या खेळाडूंना विश्रांती दिली जाते, असेही सूत्रांनी सांगितले. रोहित शर्माकडे पूर्णवेळ कर्णधारपद आल्यानंतर तो क्वचितच सलग खेळला आहे. कोहली तर प्रत्येक मालिकेत विश्रांतीची मागणी करतो, असा आरोप या सूत्राने केला आहे. ते म्हणाले,''प्रत्येक दुसऱ्या मालिकेत हे खेळाडू विश्रांती घेऊन बाहेर बसतात आणि हे सर्व खेळाडू बीसीसीआयचे करारबद्ध खेळाडू आहेत. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहित क्वचितच सलग खेळला आहे. पांड्या नुकताच संघात परतला आहे, बुमराह व शमी हेही मोजकेच सामने खेळत आहेत. प्रत्येक मालिकेनंतर कोहलीला विश्रांती दिली जाते. मग आपल्याला संघाचा तोल ढासळतोय, याची जाण होते. मागील वर्षभरात रिषभ पंत हा एकमेव खेळाडू असा आहे की तो सातत्याने खेळतोय.''
मागील ९ महिन्यांत कोण किती खेळलं?
- रोहित शर्मा - दोन कसोटी, ९ ट्वेंटी-२० व तीन वन डे
- विराट कोहली - सहा कसोटी, सहा वन डे व दोन ट्वेंटी-२०