India Tour Pakistan : भारतीय संघ २०२३मध्ये आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) त्यादृष्टीने हालचाल सुरू केल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यांना केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. २००८ साली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर या शेजारील राष्ट्रांमध्ये ना दौरे झाले ना कोणतील मालिका झाली. मुंबईवरील दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने शेजाऱ्यांशी संबंध तोडले. केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. आता १४ वर्षांनंतर भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि १८ ऑक्टोबरला BCCI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होणार आहे.
२०२३च्या प्रमुख स्पर्धा
- आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका
- आयसीसी १९ वर्षांखालील मुलींची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका
- आशिया चषक २०२३, पाकिस्तान
- आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत
Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमध्ये २०२३ साली आशिया चषक वन डे स्पर्धा होणार आहे. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपपूर्वी ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे १८ ऑक्टोबरला होणाऱ्या AGM मध्ये बीसीसीआय पाकिस्तान दौरा करण्याबाबत चर्चा करणार आहे. विशेष म्हणजे जय शाह हे आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. ''केंद्र सरकारच्या परवानगीवर सर्व काही अवलंबून आहे,''असे मत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इंग्रजी वेबसाईटशी बोलताना व्यक्त केले. यंदाचा आशिया चषक जरा यूएईत खेळवला गेला, तसा पर्यात समोर आहे, परंतु बीसीसीआयकडून तसे संकेतही दिले जात नाहीत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India Tour Pakistan : Big news! Will Team India tour Pakistan next year for Asia cup 2023? Cue from BCCI, be subject to the clearance of the government of the time
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.