Join us  

India A tour of South Africa: IPLमध्ये वेगवान मारा करणाऱ्या उम्रान मलिकला लॉटरी, प्रियांक पांचाळकडे नेतृत्व

India A tour of South Africa: आयपीएल २०२१मध्ये १५२ च्या वेगानं मारा करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या उम्रान मलिकची ( Umran Malik) याला भारत अ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात स्थान मिळाले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 8:35 PM

Open in App

India A tour of South Africa: आयपीएल २०२१मध्ये १५२ च्या वेगानं मारा करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या उम्रान मलिकची ( Umran Malik) याला भारत अ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात स्थान मिळाले आहे. गुजरातचा प्रियांक पांचाळ हा या संघाचे नेतृत्व करणार असून पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल यांचाही संघात समावेश आहे. २३ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होईल.  दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारत अ संघाचीही निवड केली गेली आहे.  भारत अ संघ येथे चार दिवसीय तीन सामने खेळेल. 

आयपीएलमध्ये यंदा सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण केलेल्या उम्रान मलिकनं सातत्यानं १५० किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधला सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर जमा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यात त्यानं तब्बल १५३ किमी प्रतितास वेगानं टाकलेला चेंडू यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. इतकंच नव्हे, तर आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. 

भारत अ संघ - प्रियांक पांचाळ ( कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यू इस्वरन, देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव, के गौथम, राहुल चहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी, उम्रान मलिक, इशन पोरेल, अर्झार नगवास्वाला ( India ‘A’ squad for South Africa tour: Priyank Panchal (Captain), Prithvi Shaw, Abhimanyu Easwaran, Devdutt Padikkal, Sarfaraz Khan, Baba Aparajith, Upendra Yadav (wicket-keeper), K Gowtham, Rahul Chahar, Saurabh Kumar, Navdeep Saini, Umran Malik, Ishan Porel, Arzan Nagwaswalla) 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२१द. आफ्रिकापृथ्वी शॉ
Open in App