India Tour of South Africa: दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी रोहित शर्माला झाली दुखापत; चाहत्यांना BCCI कडून अपडेट्सची प्रतीक्षा

India Tour of South Africa: भारतीय संघ १६ डिसेंबरला मुंबईहून-जोहान्सबर्गला रवाना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 02:05 PM2021-12-13T14:05:26+5:302021-12-13T14:06:02+5:30

whatsapp join usJoin us
India Tour of South Africa: Injury scare for vice-captain Rohit Sharma ahead of Test series | India Tour of South Africa: दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी रोहित शर्माला झाली दुखापत; चाहत्यांना BCCI कडून अपडेट्सची प्रतीक्षा

India Tour of South Africa: दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी रोहित शर्माला झाली दुखापत; चाहत्यांना BCCI कडून अपडेट्सची प्रतीक्षा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Tour of South Africa: भारतीय संघ १६ डिसेंबरला मुंबईहून-जोहान्सबर्गला रवाना होणार आहे. त्यासाठी कसोटी मालिकेसाठी निवडलेले सर्व खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत आणि आजपासून ते तीन दिवस क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. पण, या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी रोहित शर्माला ( Rohit Sharma) दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे. कसोटी संघाचा नवा उप कर्णधार रोहित याला सराव सत्रात ही दुखापत झाली आहे. थ्रोडाऊन स्पेशालिस्ट राधवेंद्र यानं टाकलेल्या चेंडूवर रोहितच्या हाताला ही दुखापत झाली आणि तो वेदनेनं कळवळला. थोड्यावेळानंतर पुन्हा एक बाऊन्सर त्याच्या ग्लोजवर जोरात आदळला. त्यामुळे तो काहीकाळ सरावापासून दूर गेला होता. 

रोहितची दुखापत किती गंभीर आहे, याचे अपडेट्स अद्याप आलेले नाही. त्यामुळे  रोहित फॅन्स चिंतीत आहेत.  २०१६मध्ये असेच सराव सत्रात अजिंक्य रहाणेच्या बोटाला दुखापत झाली होती. रोहितची दुखापत गंभीर आढळल्यास मयांक अग्रवाल व लोकेश राहुल पहिल्या कसोटीत सलामीला उतरू शकतात. मात्र, या मालिकेला अद्याप दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि तोपर्यंत रोहित पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. 

२०२१मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत जो रूटनंतर ( १५४४) रोहितचा क्रमांक  येतो. रोहितनं ११ सामन्यांत ९०६ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकं व ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं इंग्लंड दौऱ्यावर ५२+च्या सरासरीनं ३६८ धावा केल्या आहेत.

भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार),  रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्वीन, जयंत यादव, इशांत शर्मा,  मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज; राखीव - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्झान नगवास्वाला

पहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियन; दुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्ग; तिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन
 

Web Title: India Tour of South Africa: Injury scare for vice-captain Rohit Sharma ahead of Test series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.