India Tour to South Africa : शिखर धवनचे स्थान धोक्यात; कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या वन डे संघात दोन तगडे खेळाडू स्थान पटकावणार

India Tour to South Africa : भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बारतीय संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 04:11 PM2021-12-12T16:11:54+5:302021-12-12T16:12:52+5:30

whatsapp join usJoin us
India Tour to South Africa : Venkatesh Iyer and Ruturaj Gaikwad are all set to be included in India's ODI squad, Shikhar Dhawan's poor run of form would worried  | India Tour to South Africa : शिखर धवनचे स्थान धोक्यात; कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या वन डे संघात दोन तगडे खेळाडू स्थान पटकावणार

India Tour to South Africa : शिखर धवनचे स्थान धोक्यात; कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या वन डे संघात दोन तगडे खेळाडू स्थान पटकावणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Tour to South Africa : भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बारतीय संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वन डे सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया यजमानांना भिडणार आहेत. BCCIनं या दौऱ्यासाठी केवळ कसोटी संघ जाहीर केला आहे. वन डे संघाची घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे. निवड समिती सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी  स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेऊन आहेत. सलामीवीर शिखर धवन याची निराशाजनक कामगिरी ही निवड समितीची डोकेदुखी ठरतेय, परंतु दोन युवा खेळाडूंनी टीम इंडियाच्या वन डे  संघासाठी दावा सांगितला आहे. या दोघांना कामगिरीच्या जोरावर  आफ्रिका दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात स्थान मिळणे जवळपास निश्चित झाले आहे.

सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) आणि वेंकटेश  अय्यर ( Venktesh Iyer) हे दोन खेळाडू मैदान गाजवत आहेत. ऋतुराज गायकवाडनं २०२१मध्ये दमदार कामगिरीचे सत्र कायम राखले आहे. आयपीएल २०२१त त्यानं १६ डावांत ४५.३६ सरासरीनं ६३५ धावा करताना ४ अर्धशतकं व  १ शतक झळकावलं. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्यानं ४ डावांत ६४ सरासरीनं  २५६ धावा केल्यात. आता विजय हजारे ट्रॉफीतही त्याचा फॉर्म कायम आहे. त्यानं ३ डावांत २०७ सरासरीनं  ४१४  धावा केल्या आहेत. या तीनही सामन्यांत त्यानं शतक झळकावले आहे.  

वेंकटेशनं Vijay Hazare Trophy 2021-22 मागीत तीन सामन्यांत दोन शतकं व एक अर्धशतक झळकावलं आहे. महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात ४७व्या षटकात फलंदाजीला आलेल्या वेंकटेशनं ५ चेंडूंत १४ धावा केल्या होत्या. त्यानंतर केरळाविरुद्ध चौथ्या क्रमांकावर येऊन ८४ चेंडूंत ११२ धावा आणि उत्तराखंडविरुद्ध ५व्या क्रमांकावर येताना ४९ चेंडूंत ७१ धावा केल्या. मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करताना वेंकटेशनं रविवारी ११३ चेंडूंत १५१ धावांचा पाऊस पाडला. यात त्यानं ८ चौकार व १० षटकार अशा ९२ धावा अवघ्या १८ चेंडूंत कुटल्या.

''दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वेंकटेश जाणार हे निश्चित आहे. त्यानं प्रत्येक सामन्यात 9-10 षटकं फेकली आहेत. हार्दिक पांड्या अजूनही दुखापतीतून सावरतोय, त्यामुळे वेंकटेशला संधी देण्याची ही योग्य संधी आहे. या संधीतूनच तो मोठ्या स्पर्धांसाठी तयार होईल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं TOIला सांगितले. "शिखर धवननं मागच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केलं होतं आणि मॅच विनिंग खेळीही केली होती. त्यामुळे निवड समिती कदाचित त्याला आफ्रिका दौऱ्यावर अखेरची संधी देतील. ऋतुराजही संघात असेल,''असेही सूत्रांनी सांगितले.


 

Web Title: India Tour to South Africa : Venkatesh Iyer and Ruturaj Gaikwad are all set to be included in India's ODI squad, Shikhar Dhawan's poor run of form would worried 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.