India Tour of South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पुढील २४ तासांत भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन कसोटी, तीन वन डे व ४ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या प्रदीर्घ दौऱ्यासाठी बीसीसीआय जम्बो संघ निवडण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरचा नवा व्हेरियंट सापडल्यानं चिंता वाढवली असली तरी केंद्र सरकारच्या निर्णयाची बीसीसीआयला प्रतीक्षा आहे. दरम्यान, बीसीसीआय वन डे मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंची निवड करू शकते.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेनंतर विश्रांती घेणारा रोहित शर्मा दक्षिण आफ्रिके दौऱ्यातून पुनरागमन करू शकतो. त्याच्या जोडीला शिखर धवन असू शकतो. शिखर धवन हा कसोटी व ट्वेंटी-२० संघाचा सदस्य नसला तरी २०२३चा वन डे वर्ल्ड कप लक्षात घेता तो संघातील महत्त्वाचा सदस्य आहे. त्याच्याशिवाय ऋतुराज गायकवाड यालाही संधी दिली जाऊ शकते. मधल्या फळीत विराट कोहलीचेही पुनरागमन होणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर विराटही विश्रांतीवर आहे. त्याच्या जोडीला लोकेश राहुल व श्रेयस अय्यर असतील. श्रीलंका दौऱ्यातून पदार्पण करणारा सूर्यकुमार यादवही संघात कायम असेल. यष्टिरक्षक म्हणून इशान किशन ही रिषभ पंतनंतरची पहिली पसंती असेल.
अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा याला प्राधान्य दिलं जाईल. फिटनेसवर हार्दिक पांड्याचे भवितव्य अवलंबून आहे. अशात वेंकटेश अय्यरला वन डे संघात पदार्पणाची संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांचे कमबॅक, तर भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल व आर अश्विन यांनाही संधी मिळू शकते. दीपक चहर व हर्षल पटेल यांच्यात एका स्थानासाठी चुरस होईल.
असा असेल संभाव्य वन डे संघ - विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, रिषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर/हर्षल पटेल, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, आर अश्विन (Team India's probable squad for South Africa ODIs: Virat Kohli (Captain), Rohit Sharma (Vice-captain), Shikhar Dhawan, Ruturaj Gaikwad, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, KL Rahul, Rishabh Pant, Ishan Kishan, Ravindra Jadeja, Hardik Pandya, Venkatesh Iyer, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Deepak Chahar/Harshal Patel, Mohammed Shami, Yuzvendra Chahal, R Ashwin)
Web Title: India Tour of South Africa : Virat Kohli to lead; Rohit Sharma, Dhawan set for comeback: Team India's probable squad for South Africa ODIs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.