India tour of Sri Lanka: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर आहे, परंतु कोरोना व्हायरसमुळे या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. या मालिकेपूर्वी श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर होता अन् इंग्लंडच्या ३ खेळाडूंसह ७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मायदेशात परतलेल्या लंकन संघाला विलगिकरणात रहावे लागले. संघाचे फलंदाजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सर्वांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. सर्व खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर श्रीलंकेनं सरावाला सुरुवात केली, परंतु कोरोनाची भीती काही केल्यास कमी झालेली नाही. श्रीलंकेचा प्रशिक्षक PPE किट घालून खेळाडूंना सराव देताना पाहायला मिळाला. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं पोस्ट केलेल्या व्हिडीओतून हे चित्र समोर आलं. ( Sri Lankan coaches train team wearing PPE kits)
श्रीलंका दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याचा कर्णधार म्हणून विचार न केल्यानं प्रशिक्षक नाराज, केलं मोठं विधान
श्रीलंकेच्या खेळाडूंनी सोमवारपासून आर प्रेमदासा स्टेडियमवर सरावाला सुरुवात केली. यावेळी श्रीलंका संघाच्या प्रशिक्षकांचा गट व सपोर्ट स्टाफ PPE किट घालून मैदानावर उतरले. दासून शनाका, कुसर परेरा, दुष्मंथ चमीरा आणि धनंजया डी सिल्व्हा या सीनियर खेळाडूंनी सराव केला.
पाहा व्हिडीओ...
श्रीलंकेच्या ताफ्यात कोरोना व्हायरसनं शिरकाव केल्यानंतर भारत-श्रीलंका यांच्यातल्या मर्यादित षटकांच्या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १३ जुलैपासून वन डे मालिकेला सुरुवात होणार होती. पण, आता ही मालिका १८ जुलैपासून सुरू होणार आहे. मालिकेचे सामने २.३० ऐवजी आता ३ वाजल्यापासून, तर ट्वेंटी-२० सामने रात्री ८ वाजल्यापासून खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-२० मालिकेतील सामने आधी सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार होते. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.
वन डे मालिका
पहिली वन डे - १८ जुलै, दुपारी ३ वाजल्यापासूनदुसरी वन डे - २० जुलै, दुपारी ३ वाजल्यापासूनतिसरी वन डे - २३ जुलै, दुपारी ३ वाजल्यापासून
ट्वेंटी-२० मालिका
पहिली ट्वेंटी-२० - २५ जुलै, रात्री ८ वाजल्यापासूनदुसरी ट्वेंटी-२० - २७ जुलै, रात्री ८ वाजल्यापासूनतिसरी ट्वेंटी-२० - २९ जुलै, रात्री ८ वाजल्यापासून