ठळक मुद्देभुवी ( 3/54) आणि युजवेंद्र चहल ( 3/50) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. दीपकनेही दोन विकेट्स घेत श्रीलंकेला 9 बाद 275 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडलेभारताचे 7 फलंदाज 193 धावांवर माघारी परतले होते. पण, दीपक ( 69) आणि भुवी ( 19) यांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची भागीदारी करताना संघाला 3 विकेट्स व पाच चेंडू राखून विजय मिळवून दिला.
India Tour of Sri Lanka : India won by 3 wickets : भारताच्या युवा ब्रिगेडनं दुसऱ्या वन डे सामन्यात यजमान श्रीलंकेच्या तोंडातला विजयाचा घास हिस्कावला. 7 विकेट्स पडलेले असताना दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी संयमाने खेळ करताना टीम इंडियाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. 44व्या षटकानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दीपक चहरसाठी एक मॅसेज पाठवला. 'निकालाची चिंता करू नकोस, सर्व चेंडू खेळून काढ', द्रविडच्या या सल्ल्यानंतर दीपकनं फलंदाजीचा गिअर बदलला अन् रोमहर्षक विजय मिळवून दिला. या विजयानंतर,'भारतीय संघ चॅम्पियन्ससारखा खेळला,' अशी प्रतिक्रिया द्रविडनं दिली.
राहुल द्रविडनं पाठवला 'सिक्रेट मॅसेज' अन् टीम इंडियाचा विजय; दीपक चहरनं उलगडले रहस्य!
सामन्यानंतर द्रविड मैदानावर आला अन् त्यानं दीपक चहरला घट्ट मीठी मारली. त्यानंतर द्रविडनं ड्रेसिंग रुममध्ये प्रेरणादायी भाषण केलं. 276 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 7 फलंदाज 193 धावांवर माघारी परतले होते. पण, दीपक ( 69) आणि भुवी ( 19) यांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची भागीदारी करताना संघाला 3 विकेट्स व पाच चेंडू राखून विजय मिळवून दिला. भारतानं या विजयासह मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
द्रविड म्हणाला,''निकाल आमच्या बाजूनं लागला. तो अविश्वसनीय आणि दर्जेदार होता. जरी हा निकाल आमच्या बाजूने लागला नसता तरी खेळाडूंनी तगडं आव्हान दिलं आणि तेही कौतुकास पात्र होतेच. सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. प्रतिस्पर्धी संघ प्रत्युत्तर देणार हे आपल्याला माहीत होतंच, त्यांचा आदर करायला हवाच. प्रतिस्पर्धीही आंतरराष्ट्रीय टीम आहे आणि त्यांनी प्रत्युत्तर दिले, परंतु आम्ही त्यांना चॅम्पियन्ससारखे प्रत्युत्तर दिले.''
भुवी ( 3/54) आणि युजवेंद्र चहल ( 3/50) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. दीपकनेही दोन विकेट्स घेत श्रीलंकेला 9 बाद 275 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. सलामीवीर अविष्का फर्नांडो ( 50) आणि चरीथ असलंका ( 65) यांनी अर्धशतक झळकावले. ''वैयक्तिक खेळाडूवर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही, परंतु खरंच काही खेळाडूंनी दर्जेदार खेळ केला आणि विशेषतः सामन्याच्या शेवटाला. या विजयात प्रत्येक खेळाडूचे योगदान आहे आणि त्यांचे कौतुक करायलाच हवे. हा सांघिक विजय आहे,''असेही द्रविड म्हणाला.