शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी आज रवाना झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यावर दुसऱ्या फळीतील खेळाडू पाठवण्याचा निर्णय घेतला. या दौऱ्याचे विशेष म्हणजे महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असणार आहे. त्यामुळे धवनची कॅप्टन इनिंग आणि द्रविडची प्रशिक्षक म्हणून इनिंग कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय संघातील खेळाडू श्रीलंकेत पोहोचल्यानंतर विलगीकरणात राहणार आहेत.
बाबो : महिला फॅनमुळे Tour de France मध्ये झाला मोठा अपघात; शेकडो सायकलपटू झाले दुखापतग्रस्त, पाहा Video
श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात देवदत्त पडीक्कल, चेतन सकारिया, अर्षदीप सिंग, नितीश राणा, वरुण चक्रवर्थी, ऋतुराज गायकवाड आदी खेळाडूंना पदार्पणाची संधी आहे. भुवनेश्वर कुमार उपकर्णधाराच्या भूमिकेत असून जलदगती गोलंदाजांचे तो नेतृत्व करेल. त्याच्यासह दीपक चहर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव व युझवेंद्र चहल यांच्यावरही गोलंदाजीची जबाबदारी आहे.
भारतीय संघ - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया
नेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग
स्पर्धेचे वेळापत्रकवन डे मालिका - 13, 16 व 18 जुलै, कोलंबोट्वेंटी-20 मालिका - 21, 23 व 25 जुलै, कोलंबो