India tour of Sri Lanka: भारत-श्रीलंका मालिकेच्या नव्या तारखा जाहीर केल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डानं आता सामन्यांच्या वेळेत बदल केला आहे. SLCनं सोमवारी सोशल मीडियावरून त्याची घोषणा केली. इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशात परतलेल्या श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक अन् सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोना झाल्यानंतर सर्व खेळाडूंना विलगिकरणात ठेवण्यात आले होते. आता त्या सर्व खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि श्रीलंका सरकारनंही या मालिकेला ग्रीन सिग्नल दिला आहे.
तीन महिन्यांत दिनेश चंडीमलकडून काढून घेण्यात आले नेतृत्व, आता 'श्रीलंकन आर्मी'त झालाय भरती!
SLCच्या पोस्टनुसार भारत-श्रीलंका यांच्यातल्या वन डे मालिकेचे सामने २.३० ऐवजी आता ३ वाजल्यापासून, तर ट्वेंटी-२० सामने रात्री ८ वाजल्यापासून खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-२० मालिकेतील सामने आधी सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार होते. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.
वन डे मालिका
- पहिली वन डे - १८ जुलै, दुपारी ३ वाजल्यापासून
- दुसरी वन डे - २० जुलै, दुपारी ३ वाजल्यापासून
- तिसरी वन डे - २३ जुलै, दुपारी ३ वाजल्यापासून
ट्वेंटी-२० मालिका
- पहिली ट्वेंटी-२० - २५ जुलै, रात्री ८ वाजल्यापासून
- दुसरी ट्वेंटी-२० - २७ जुलै, रात्री ८ वाजल्यापासून
- तिसरी ट्वेंटी-२० - २९ जुलै, रात्री ८ वाजल्यापासून
- भारतीय संघ - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया
- नेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग
- श्रीलंका संघ - अद्याप संघ जाहीर करण्यात आलेला नाही...
- सर्व सामने कोलंबो येथे खेळवण्यात येतील
- थेट प्रक्षेपण - सोनी सिक्स इंग्लिश व सोनी टेन ३ हिंदी