India Tour of Sri Lanka : भारत-श्रीलंका यांच्यातल्या मर्यादित षटकांच्या मालिकेला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशात परतलेल्या श्रीलंकन संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर अन् संघ विश्लेषक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्यासह खेळाडूंना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी समोर आलेल्या वृत्तानुसार १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या मालिकेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात येणार आहे. १७ जुलैपासून ही मालिका सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. त्या आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे ग्रँड फ्लॉवर यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेण्यास नकार दिला होता. त्यांना Pfizer लस हवी होती. ( Sri Lanka batting coach Grant Flower refused vaccination, requested for Pfizer)
श्रीलंका क्रिकेट बोर्डानं खेळाडू व सपोर्ट स्टाफसाठी लस उपलब्ध केली होती. फ्लॉवर यांनी चायनीस आणि रशियन लस घेण्यास स्पष्ट नकार दिला. झिम्बाब्वेचे माजी खेळाडू फ्लॉवर यांना Pfizer हीच लस हवी होती, कारण अन्य लस घेतल्यास त्यांना मायदेशात जाता येणार नाही, अशी भीती होती. अशी माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्व्हा यांनी दिली. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं आता फ्लॉवर यांच्यासाठी Pfizer लस मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना ही लस दिली जाईल. मायदेशात परतण्यापूर्वी श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता आणि इंग्लंड संघातील तीन खेळाडूंसह सात जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यानंतर श्रीलंकेचे सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ सदस्य श्रीलंकेत परतले.
WI vs AUS : ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज १९ धावांत माघारी; वेस्ट इंडिजने मारली बाजी, १० वर्षांत आंद्रे रसेलचे पहिले अर्धशतक!
भारत-श्रीलंका मालिकेला १७ जुलैपासून होणार सुरुवात
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचे मर्यादित सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक शुक्रवारी बदलण्यात आले. कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे यजमान संघात अस्वस्थता पसरली. फलंदाजी कोच आणि सहयोगी स्टाफ पॉझिटिव्ह आल्यानंतर आता पहिला सामना १३ जुलैऐवजी १७ जुलै रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मालिका आता १३ ऐवजी १७ जुलैपासून सुरू होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य या गोष्टी लक्षात घेत एसएलसीसोबत सल्लामसलत केल्यानंतर मालिका चार दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सूत्रांनी दिली. जे वन डे सामने आधी १३, १६ आणि १९ जुलै रोजी होणार होते ते आता १७ नंतरच्या तारखांना होतील.
Web Title: India Tour of Sri Lanka : Sri Lanka batting coach Grant Flower refused vaccination, requested for Pfizer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.