India Tour to England : भारतीय संघ १६ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. मागच्या दौऱ्यावर स्थगित झालेला कसोटी सामना १ जुलैला खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि हा पाचवा सामना जिंकून भारताला इतिहास घडवण्याची संधी आहे. पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय संघ २४ ते २७ जून या कालावधीत चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या सीनियर खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती दिली. पण, या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाला धक्का देणारी बातमी समोर येत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत लोकेश राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते, परंतु KL Rahul ने पहिल्या सामन्यापूर्वीच दुखापतीमुळे माघार घेतली. तो थेट राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला, परंतु आता लोकेश इंग्लंडविरुद्धच्या कसोटीलाही मुकणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. १ ते ५ जुलै या कालावधीत ही कसोटी एडबस्टन येथे खेळवली जाणार आहे. NCA मध्ये दुखापतीवर उपचार घेण्यासाठी गेलेला लोकेश अजूनही पूर्णपणे तंदुरूस्त झालेला नाही. त्यामुळे त्याचे इंग्लंड दौऱ्यावर जाणे अनिश्चित मानले जात आहे, तो मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळेल की नाही, यावरही संभ्रम आहे. भारतीय खेळाडू १६ जूनला रवाना होतील, तर राहुल द्रविड, रिषभ पंत, श्रेयस अय्यर हे २० जूनला इंग्लंडसाठी रवाना होतील.
भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक
- चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब - २४ ते २७ जून
- भारत अ वि. डर्बिशायर ट्वेंटी-२० - १ जुलै
- पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन
ट्वेंटी-२० मालिका
- पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल
- दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन
- तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज
वन डे मालिका
- पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल
- दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
- तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा ( India's Test squad: Rohit Sharma (Captain), KL Rahul (vice-captain) Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Hanuma Vihari, Cheteshwar Pujara, Rishabh Pant (wk), KS Bharat (wk), Ravindra Jadeja, Ravichandran Ashwin, Shardul Thakur, Mohd Shami, Jasprit Bumrah, Mohd Siraj, Umesh Yadav, Prasidh Krishna)
Web Title: India Tour to England : KL Rahul doubtful for the Edgebaston Test against England starting from 1st July
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.