क्रिकेट वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना, जेतेपद कायम राखण्याचे आव्हान

युवा खेळाडूंवर मदार...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 06:45 PM2019-12-20T18:45:59+5:302019-12-20T18:46:43+5:30

whatsapp join usJoin us
India U19 left for South Africa today where they will take part in U19 Cricket World Cup | क्रिकेट वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना, जेतेपद कायम राखण्याचे आव्हान

क्रिकेट वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना, जेतेपद कायम राखण्याचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पुरुष व महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा ऑस्ट्रेलियात होत असल्यानं क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. पण, तत्पूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्यासाठी भारतीय संघ शुक्रवारी रवाना झाला. 19 वर्षांखालील या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडिया रवाना झाली आहे. 

17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.  भारतीय संघाने चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. 2000, 2008, 2012 आणि 2018मध्ये वर्ल्ड कप विजयाचा मान टीम इंडियानं पटकावला आहे. यावेळी त्यांच्यावर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. प्रियाम गर्गच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपद कायम राखण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या संघात अथर्व अंकोलेकर, दिव्यांश सक्सेना व यशस्वी जैस्वाल या मुंबईच्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. 


भारतीय संघ - प्रियम गर्ग ( कर्णधार),  ध्रुवचंद जुरेल ( उपकर्णधार-यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभंग  हेगडे, रवी विश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशग्रा ( यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील. 

भारतीय संघाचे वेळापत्रक
अ गट  - भारत, जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंका
ब गट - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नायजेरिया आणि वेस्ट इंडिज
क गट - बांगलादेश, पाकिस्तान, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे
ड गट - अफगाणिस्तान, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती

भारताचे सामने
19 जानेवारी - वि. श्रीलंका
21 जानेवारी - वि. जपान 
24 जानेवारी - वि. न्यूझीलंड

Web Title: India U19 left for South Africa today where they will take part in U19 Cricket World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.