ACC Men’s U19 Asia Cup India's Squad : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-१९ आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. १५ सदस्यीय संघ जाहीर झाला असून उदय सहारनला कर्णधार बनवण्यात आले आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली. दुबईच्या यजमानात ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेला ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना रविवारी १७ डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय संघात मुशीर खानला संधी मिळाली आहे, जो रणजी ट्रॉफी गाजवणाऱ्या सर्फराज खानचा भाऊ आहे.
अंडर-१९ आशिया चषक २०२३ साठी भारतीय संघ -
उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलरनी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार, मुर्गन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौड, आराध्या शुक्ला, नमम तिवारी, राज लिंबानी.
राखीव खेळाडू - प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन.
दरम्यान, भारतीय संघ अंडर-१९ आशिया चषकाचा गतविजेता आहे. अर्थात भारताने मागील हंगामात विजेतेपद पटकावले होते. भारताचा अंडर-१९ संघ हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या स्पर्धेत भारताने सर्वाधिक आठवेळा किताब जिंकला आहे. मागील पर्वात २०२२ मध्ये निशांत सिंधूच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. टीम इंडियाने एकतर्फी सामना जिंकला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा संघ ३८ षटकांत अवघ्या १०६ धावांत सर्वबाद झाला. भारताकडून विकी ओस्तवालने सर्वाधिक ३ बळी घेतले. याशिवाय कौशल तांबेने २ बळी घेतले. तर रवी कुमार आणि राज बावा यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले होते.
Web Title: India U19 squad BCCI announces India squad for ACC Men’s U19 Asia Cup 2023, Sarfaraz Khan's younger brother gets chance, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.