India U19 vs United Arab Emirates U19 Vaibhav Suryavanshi Smash Fifty Also Hit Log Six : १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत IPL मेगा लिलावात लोकप्रिय ठरलेला चेहरा अखेर चमकला आहे. भारताकडून अवघ्या १३ व्या वर्षी अंडर १९ संघात पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशी याने युएई विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.
पहिल्या दोन सामन्यात ठरला होता अपयश
पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या लढतीत एका धावेवर बाद झाल्यानंतर डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या पोरानं जपान विरुद्ध २३ धावांच्या खेळीत आपल्या भात्यातील बॅटिंगचा ट्रेलर दाखवून दिला होता. त्यानंतर सेमी फायनलमध्ये एन्ट्री मारण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या भात्यातून दमदार फिफ्टी आली. त्याने ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या भात्यातून १०० मीटर लांब असा उत्तुंग षटकारही पाहायला मिळाला.
मेगा लिलावात विक्रमी बोली लागल्यापासून चर्चेत असणारा चेहरा
IPL च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सच्या संघानं वैभव सूर्यवंशीवर १ कोटी १० लाख रुपये बोली लावून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. मेगा लिलावात सर्वात कमी वयात एवढी मोठी रक्कम मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला. विक्रमी बोली लागल्यावर आशिया कप स्पर्धेतील एन्ट्रीतही त्याने विक्रमी डाव साधला.
अंडर १९ संघातून एन्ट्रीतही नावे केला खास विक्रम
भारतीय संघाकडून अंडर १९ संघात खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. याआधी हा विक्रम पियूष चावलाच्या नावे होते. तो वयाच्या १५ वर्षी अंडर १९ संघात खेळला होता. वैभव सूर्यंवशी वयाच्या १३ व्या वर्षी या संघाचा भाग झालाय. त्यामुळे १३ वर्षाचं हे पोरग कशी कामगिरी करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या.
७६ धावांच्या खेळीत ३ खणखणीत चौकारांसह मारले ६ उत्तुंग षटकार
वैभव सूर्यंवशी याने पहिल्या दोन डावातील अपयश भरून काढताना ३२ चेंडूत अर्धशतक साजरे केले. एवढ्यावरच न थांबता सामन्यात शेवटपर्यंत नाबात राहून त्याने ४६ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७६धावांची खेळी साकारली. १९ वर्षाखालील वनडे क्रिकेटमध्ये वैभवची ही सर्वोच्च खेळी आहे. याआधी कसोटी सामन्यात त्याच्या भात्यातून शतक पाहायला मिळाले होते. आशिया कप स्पर्धेत तो शतकी डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: India U19 vs United Arab Emirates U19 Vaibhav Suryavanshi Smash Fifty Also Hit Log Six In Inning Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.