क्वालालम्पूर : नेपाळकडून पराभूत झाल्यानंतर गतविजेता भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघ‘करा किंवा मरा’ या सामन्यात बांगलादेशकडूनही आठ गड्यांनी पराभूत होताच आशिया चषक स्पर्धेबाहेर पडला. तीन दिवसांत भारताचा हा दुसरा पराभव होता.पावसामुळे ३२ षटकांचा सामना खेळविण्यात आला.भारताने प्रथम फलंदाजी करीत ८ बाद १८७ धावा उभारल्या. बांगलादेशने चार षटके शिल्लक राखून २ बाद १९१ धावा करीत सामना जिंकला.भारत पराभूत झाल्याने नेपाळ व बांगलादेशने उपांत्य फेरीत धडक दिली. ब गटातून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाºया विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारताने स्पर्धेत नव्या दमाचे खेळाडू पाठविले होते. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारताचा अंडर-१९ क्रिकेट संघ आशिया चषकाबाहेर
भारताचा अंडर-१९ क्रिकेट संघ आशिया चषकाबाहेर
नेपाळकडून पराभूत झाल्यानंतर गतविजेता भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघ‘करा किंवा मरा’ या सामन्यात बांगलादेशकडूनही आठ गड्यांनी पराभूत होताच आशिया चषक स्पर्धेबाहेर पडला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:38 AM