Join us  

IND vs WI ODI Series : टीम इंडियाच्या 'या' दोन युवा खेळाडूंमुळे आमच्यावर मालिका गमावण्याची वेळ आली; फिल सिमन्स यांचे प्रांजळ मत

भारतीय संघाने सलग १२ वन डे मालिकांमध्ये वेस्ट इंडिजवर विजय मिळवला, परंतु त्यांच्या घरच्या मैदानावर ३-० असा विजय मिळवणारा शिखर धवन हा भारताचा पहिलाच  कर्णधार ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 4:46 PM

Open in App

India v West Indies : भारतीय संघाने वन डे मालिकेत वेस्ट इंडिजवर ३-० असा निर्भेळ यश मिळवला. भारतीय संघाने सलग १२ वन डे मालिकांमध्ये वेस्ट इंडिजवर विजय मिळवला, परंतु त्यांच्या घरच्या मैदानावर ३-० असा विजय मिळवणारा शिखर धवन हा भारताचा पहिलाच  कर्णधार ठरला. पहिल्या दोन सामन्यांत विंडीजकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली, परंतु तिसऱ्या वन डेत यजमानांनी सपशेल शरणागती पत्करली. याआधी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना संपूर्ण ५० षटकं खेळता आली नव्हती.  

काल झालेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे विंडीजसमोर ३५ षटकांत २५७ धावांचे लक्ष्य ठेवले गेले होते. पण, त्यांचा संपूर्ण संघ २६ षटकांत १३७ धावांत तंबूत परला अन् भारताने ११९ धावांनी विजय मिळवला. युजवेंद्र चहलने चार, शार्दूल ठाकूर व मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यानंतर विंडीजचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स ( Phil Simmons) यांना पराभवामागचं कारण विचारले असता, त्यांनी भारताच्या दोन युवा खेळाडूंची नावं घेतली.

मोहम्मद सिराज व शुबमन गिल यांच्यामुळे वेस्ट इंडिजवर मालिका पराभवाची नामुष्की ओढावली असे, मत सिमन्स यांनी व्यक्त केले. सिराजने तीन सामन्यांत चार विकेट्स घेतल्या, तर गिलने या मालिकेत २०५ धावा करून मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार पटकावला. पहिल्या वन डे सामन्यात सिराजने अखेरच्या षटकात भारताला विजय मिळवून दिला आणि तिसऱ्या वन डेत पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेत विंडीजला बॅकफूटवर फेकले.

''मोहम्मद सिराज व शुबमन गिल हे विंडीजच्या पराभवामागची दोन कारणं आहेत. सिराजने पहिल्या वन डेत टाकलेले अखेरचे षटक उल्लेखनीय होते. नवीन चेंडूसह तो कमाल करून दाखवतोय. शार्दूल ठाकूरही चांगली गोलंदाजी करतो. भारताचा गोलंदाजी विभाग हा आमच्यापेक्षा वरचढ होता, ''असे सिमोन्स म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले की,''पावसाने तिसऱ्या सामन्यात खोडा घातला, परंतु तो दोन्ही संघांसाठी समान धक्का होता. पावसाचं कारण पुढे करून आम्ही आमचे अपयश लपवणार नाही. धावांचा पाठलाग करताना आम्ही झटपट विकेट गमावल्या.''  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशुभमन गिलमोहम्मद सिराज
Open in App