मुंबई, भारत विरुद्ध इंग्लंड : भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली. चौथ्या कसोटी सामन्यात त्यांना रविवारी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावर शास्त्री यांना ट्रोल केले जात असून त्यांना आता मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चौथ्या कसोटी सामन्यानंतर कोहली म्हणाला की, " आम्ही दुसऱ्या डावात जेव्हा फलंदाजीला उतरलो तेव्हा खेळपट्टी खराब झाली होती. चेंडू चांगलेच वळत होते. इंग्लंडने दिलेले आव्हान अशक्यप्राय नव्हते. पण आमची सुरुवात चांगली झाली नाही. तीन फलंदाजांना आम्ही फार लवकर गमावले. त्याचा कुठेतरी परिणाम संघाच्या फलंदाजीवर झाला. "
एका चाहत्याने तर शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याने म्हटले की, " शास्त्री हे भरपूर बडबड करतात. पण त्यांना संघाची कामगिरी सुधारता आलेली नाही. ते बऱ्याचदा आम्ही आता परदेशातही मालिका जिंकू, असे बोलले होते. पण भारताची या मालिकेतील कामगिरी सर्वासमोर आहे. "