लंडन : इंग्लंडमधील पराभवानंतर भारताचे प्रशिक्षक रवी शआस्त्री हे टीकेचे धनी ठरत आहेत. पण बीसीसीआयने त्यांना पैशांनीही धनी बनवले आहे. कारण रवी शास्त्री हे सर्वात श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक ठरले आहेत.
इंग्लंडच्या 2014 साली झालेल्या दौऱ्यात शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाच्या संचालकपदी नियुक्ती केले होती. त्यानंतर एका वर्षासाठी अनिल कुंबळे यांची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. पण भारताचा कर्णधार विराट कोहली आणि कुंबळे यांच्यामधून विस्तवही जात नव्हता. त्यामुळे अखेर बीसीसीआयने कुंबळे यांना पदावरून हटवले आणि पुन्हा एकदा प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले. त्यावेळी शास्त्री यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. आगामी विश्वचषकापर्यंत त्यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड कायम ठेवण्यात आली आहे.
बीसीसीआयने यावेळी शास्त्री यांना त्यांचे मानधन आगाऊ दिले आहे, ही रक्कम आहे 2.5 कोटी रुपये. शास्त्री यांना एका वर्षाचे मानधन किती आहे, हे ऐकाल तर तुम्ही चक्रावून जालं. कारण क्रिकेट विश्वामध्ये कोणत्या प्रशिक्षकाला एवढे मानधन सध्याच्या घडीला मिळताना दिसत नाही. शास्त्री यांनी एका वर्षासाठी आठ कोटी एवढे मानधन बीसीसीआय देत आहे.