कार्डिफ - 3 फलंदाज 44 धावांवर माघारी परतल्यानंतर इंग्लंडने सावध पवित्रा घेतला. अॅलेक्स हेलने एकट्याने खिंड लढवताना अर्धशतकी खेळी केली आणि संघाला 5 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या विजयानंतर इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी घेतली आहे.
- अॅलेक्स हेलच्या नाबाद 58 धावा
- विलीच्या विजयी फटक्यानंतर मालिकेत 1-1 बरोबरी
- तिस-या चेंडूवर चौकार
- भुवनेश्वरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून हेलचे अर्धशतक पूर्ण
- इंग्लंडला अखेरच्या षटकात 12 धावांची आवश्यकता
- इंग्लंडला पाचवा धक्का, विजयासाठी 17 चेंडूंत 23 धावा
- 30 चेंडूंत 46 धावांची गरज
-- ईयॉन मॉर्गनचा शिखर धवनकडून अप्रतिम झेल
- 10 षटकांत 3 बाद 59 धावा
- इंग्लंडला तिसरा धक्का जो रूटही तंबूत परतला
- जोस बटलरही माघारी, इंंग्लंड 5 षटकांत 2 बाद 33
- जेसन रॉय बाद, इंग्लंड 1 बाद 25 धावा
धोनीची अखेरच्या षटकात दमदार फलंदाजी; भारताच्या 148 धावा
कार्डिफ : महेंद्रसिंग धोनीने अखेरच्या षटकात केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत 148 धावा करता आल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना स्वस्तात बाद केले. पण त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. कोहलीने 38 चेंडूंत 47 धावा, पण संघाला गरज असताना अखेरच्या षटकामध्ये कोहलीने आपली विकेट गमावली. पण आपला पाचशेवा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या धोनीने मात्र अखेरच्या षटकात तीन चौकार लगावत दमदार फटकेबाजी केली. धोनीने 24 चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर नाबाद 32 धावांची खेळी साकारत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
- भारताचे इंग्लंडपुढे 149 धावांचे आव्हान
- विराट कोहली OUT; भारताला पाचवा धक्का
- महेंद्रसिंग धोनी खेळतोय पाचशेवा आंतरराष्ट्रीय सामना
- सोळाव्या षटकात भारताचे शतक पूर्ण
- सुरेश रैना OUT; भारताला चौथा धक्का
- कोहली आणि रैना यांची अर्धशतकी भागीदारी
- भारत 10 षटकांत 3 बाद 52
- लोकेश राहुल CLEAN BOWLED; भारताला तिसरा धक्का
- रोहितपाठोपाठ धवनही OUT; भारताला दुसरा धक्का
- रोहित शर्मा OUT; भारताला पहिला धक्का
- रोहित शर्माचा भारतासाठी पहिला चौकार
कार्डिफ : भारताने इंग्लंडविरुद्धचा पहिला ट्वेन्टी-20 सामना सहज जिंकला. आता इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या युद्धासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्या युद्धात भारत प्रथम फलंदाजी करताना किती धावा करतो याची उत्सुकता साऱ्यांना असेल. त्याचबरोबर हा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले असेल.
दोन्ही संघ
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले
भारतीय संघ मैदानात दाखल होतानाचा व्हीडीओ