Join us  

IND vs AFG 1st T20I : राहुल द्रविडला विजयाचं बर्थ डे गिफ्ट! शिवम दुबेचा मौके पे चौका, मॅच विनिंग खेळी

शिवम दुबेच्या ( Shivam Dube) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 10:07 PM

Open in App

India vs Afghanistan 1st T20I Marathi Update ( Marathi News ) :  ४२७ दिवसानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळण्यासाठी उतरलेल्या रोहित शर्माचे फलंदाज म्हणुन पुनरागमन चांगले झाले नाही, परंतु कर्णधार म्हणून त्याने विजयी कमबॅक केले. शिवम दुबेच्या ( Shivam Dube) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शुबमन गिल, तिलक वर्मा व जितेश शर्मा यांनीही चांगला खेळ केला. गोलंदाजी अक्षर पटेल व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

Video : रोहित शर्माला राग अनावर झाला, Live मॅचमध्ये शुबमन गिलवर भडकला; चांगलाच झापला

 भारताची सुरुवात खूपच खराब झाली. १४ महिन्यानंतर ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या रोहितला दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर माघारी जावे लागले. रोहितने एक धाव घेण्यासाठी क्रिज सोडले होते, परंतु शुबमन गिल मिड ऑनला चेंडू पाहत राहिला अन् अफगाणिस्तानला रन आऊटची आयती संधी मिळाली. बाद झाल्यावर रोहित गिलवर भडकला. गिलने त्यानंतर ५ चौकार खेचून रोहितच्या विकेटची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. पण, मुजीब उर रहमानच्या गुगलीवर पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. गिल १२ चेंडूंत २३ धावांवर यष्टिचीत झाला. भारताला ६ षटकांत २ बाद ३६ धावा करता आल्या.  शिवम दुबेला आज फलंदाजीला पुढे पाठवण्यात आले आणि तो तिलक वर्मासह डाव सावरताना दिसला. नवीन उल हकच्या पहिल्याच षटकात या दोघांनी १४ धावा कुटल्या.  उमरजाईच्या पहिल्या षटकात तिलकने मोठे फटके मारले, परंतु चौथ्या चेंडूवर सीमारेषेवर गुलबदीन नईबने झेल टिपला. तिलक २६ धावांवर बाद झाल्याने त्याची शिवमसोबत ४४ ( २९ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. पण, भारताने १० षटकांत ३ बाद ८३ धावा उभ्या केल्या होत्या. जितेश शर्माने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि शिवमसह ३१ चेंडूंत ४५ धावांची भागीदारी केली. जितेश २० चेंडूंत ३१ धावांवर मुजीबच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रिंकू सिंग मैदानावर येताच प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केले. शिवमने एक बाजू धरून ठेवताना ३८ चेंडूंत ट्वेंटी-२०तील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. भारताने १७.३ षटकांत ४ बाद १५९ धावा करून विजय मिळवला. शिवम ६० चेंडूंवर नाबाद राहिला. रिंकूनेही ९ चेंडूंत नाबाद १६ धावा केल्या. 

 

तत्पूर्वी, रहमनुल्लाह गुरबाज ( २३) व कर्णधार इब्राहिम जादरान ( २५) यांनी अर्धशतकी भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. पण, अक्षर पटेलने २ व शिवम दुबेने १ विकेट घेत त्यांची अवस्था ३ बाद ५७ अशी केली. मोहम्मद नबी ( ४२) व अझमतुल्लाह उमरजाई ( २९) यांनी डाव सारवला आणि ४३ चेंडूंत ६८ धावा जोडल्या. मुकेश कुमारने एकाच षटकात दोघांनाही माघारी पाठवले. अफगाणिस्तानने ५ बाद १५८ धावा करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. त्यांनी शेवटच्या १० षटकांत १०१ धावा चोपल्या. अक्षर व मुकेश यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. 

 

टॅग्स :रोहित शर्माभारतअफगाणिस्तान