भारताने टॉस जिंकला, पण रोहित शर्माच्या विधानामुळे राहुल द्रविड 'खोटा' ठरला

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ शेवटची ट्वेंटी-२० मालिका खेळतोय. १४ महिन्यानंतर रोहित शर्माचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 06:42 PM2024-01-11T18:42:38+5:302024-01-11T18:42:59+5:30

whatsapp join usJoin us
India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : India win the toss and opts to bowl,  Yashasvi Jaiswal was unavailable for selection for the first T20I due to a sore right groin. | भारताने टॉस जिंकला, पण रोहित शर्माच्या विधानामुळे राहुल द्रविड 'खोटा' ठरला

भारताने टॉस जिंकला, पण रोहित शर्माच्या विधानामुळे राहुल द्रविड 'खोटा' ठरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Afghanistan 1st T20I Marathi Update ( Marathi News )  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ शेवटची ट्वेंटी-२० मालिका खेळतोय. १४ महिन्यानंतर रोहित शर्माचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विराट कोहलीचाही या मालिकेत समावेश केला गेला होता, परंतु तो वैयक्तिक कारणास्तव आजच्या सामन्यात खेळत नाही.  रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.. अफगाणिस्तान प्रथम फलंदाजी करणार आहे.


विराटच्या गैरहजेरीत यशस्वी जैस्वाल व रोहित ही जोडी सलामीला येईल असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले होते. पण, आज यशस्वीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले गेले आहे. आजच्या सामन्यात चार खेळाडूंना संधी न मिळाल्याचे रोहितने सांगितले. यामध्ये संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, आवेश खान व कुलदीप यादव यांचे नाव आहे. उजव्या मांडीच्या दुखण्यामुळे यशस्वी पहिल्या T20I साठी निवडीसाठी अनुपलब्ध नसल्याचे बीसीसीआयने सांगितले. आता गिल व रोहित सलामीला येतील. 


रोहित म्हणाला, " प्रथम गोलंदाजी करण्यामागे कोणतेही खास कारण नाही, इथली खेळपट्टी फारशी बदलत नाही. या तीन सामन्यांतून बरेच काही मिळवायचे आहे. वर्ल्ड कप पूर्वी आमच्याकडे फार ट्वेंटी-२० सामने नाहीत. त्यानंतर आमच्याकडे आयपीएल आहे, परंतु आंतरराष्ट्रीय सामना हा आंतरराष्ट्रीय आहे. संघ ज्या दिशेने जात आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. मी गेले वर्षभर संघात नव्हतो, पण आपण काय करत आहोत आणि एक गट म्हणून आपल्याला काय करण्याची गरज आहे याबद्दल मी राहुलभाईंशी बोलत आहे. जिंकणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. संजू, आवेश, जैस्वाल आणि कुलदीप खेळत नाहीत."


Web Title: India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : India win the toss and opts to bowl,  Yashasvi Jaiswal was unavailable for selection for the first T20I due to a sore right groin.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.