India vs Afghanistan 1st T20I Marathi Update ( Marathi News ) : रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पुनरागमन फार चांगले झाले नसले तरी त्याच्या नावावर आज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली. फलंदाज म्हणून रोहित दुर्दैवाने शून्यावर बाद झाला, परंतु कर्णधार म्हणून त्याने विजयी पुनरागमन केले. या विजयासह त्याच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली.
रहमनुल्लाह गुरबाज ( २३) व कर्णधार इब्राहिम जादरान ( २५) यांनी अर्धशतकी भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. मोहम्मद नबी ( ४२) व अझमतुल्लाह उमरजाई ( २९) यांनी डाव सारवला आणि ४३ चेंडूंत ६८ धावा जोडल्या. अफगाणिस्तानने ५ बाद १५८ धावा करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. त्यांनी शेवटच्या १० षटकांत १०१ धावा चोपल्या. अक्षर व मुकेश यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
भारताची सुरुवात खूपच खराब झाली. १४ महिन्यानंतर ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या रोहितला दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर रन आऊट होऊन माघारी जावे लागले. शुबमन गिल १२ चेंडूंत २३ धावा केल्या. शिवम दुबे व तिलक वर्मा ( २६) यांनी ४४ ( २९ चेंडू) धावांची भागीदारी केली. जितेश शर्मानेही २० चेंडूंत ३१ धावा करताना शिवमसह ४५ धावा जोडल्या. भारताने १७.३ षटकांत ४ बाद १५९ धावा करून विजय मिळवला. शिवम ६० चेंडूंवर नाबाद राहिला. रिंकूनेही ९ चेंडूंत नाबाद १६ धावा केल्या.
कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित ( ४०) पाचव्या क्रमांकावर आला. अफगाणिस्तानचा असघर अफघान ( ४२), इंग्लंडचा इयॉन मॉर्गन ( ४२) व पाकिस्तानचा बाबर आजम ( ४२) हे संयुक्तपणे आघाडीवर आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नावावर ४० विजय आहेत. पण, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सर्वाधिक १०० विजयाचा सदस्य असलेला रोहित हा एकमेव खेळाडू आहे. त्यानंतर पाकिस्तानचा शोएब मलिक ( ८६), भारताचा विराट कोहली ( ७३) यांचा क्रमांक येतो.
महिला क्रिकेटपटूंमध्ये इंग्लंडची डॅनी वॅट ( १११), ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली ( १००) व एलिसे पेरी ( १००) यांनी असा विक्रम केला आहे.
Web Title: India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : Rohit Sharma becomes the first player in the history to be part of the 100 wins in Men's T20I.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.