Join us  

कडाक्याच्या थंडीत रोहित शर्माचा 'जुगाड', कॅच घेतल्यानंतर हाताला झिणझिण्या अन्...  

India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ शेवटची ट्वेंटी-२० मालिका खेळतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 7:48 PM

Open in App

India vs Afghanistan 1st T20I Marathi Update  ( Marathi News ) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ शेवटची ट्वेंटी-२० मालिका खेळतोय. १४ महिन्यानंतर रोहित शर्माचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना अफगाणिस्ताला ५७ धावांवर ३ धक्के दिले आहेत. कडाक्याच्या थंडीत क्षेत्ररक्षण करणे जोखमीचे होत असले तरी रोहितने चांगलाच जुगाड शोधून काढला. झेल घेतल्यानंतर त्याच्या हाताला झिणझिण्या आल्या अन् त्याने त्वरित हॉट बॅग मागवून हाताला शेक दिला. 

भारताने टॉस जिंकला, पण रोहित शर्माच्या विधानामुळे राहुल द्रविड 'खोटा' ठरला

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराटच्या गैरहजेरीत यशस्वी जैस्वाल व रोहित ही जोडी सलामीला येईल असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले होते. पण, आज यशस्वीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले गेले आहे. आजच्या सामन्यात चार खेळाडूंना संधी न मिळाल्याचे रोहितने सांगितले. यामध्ये संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, आवेश खान व कुलदीप यादव यांचे नाव आहे. उजव्या मांडीच्या दुखण्यामुळे यशस्वी पहिल्या T20I साठी निवडीसाठी अनुपलब्ध नसल्याचे बीसीसीआयने सांगितले.  रोहित आज ट्वेंटी-२०त भारताचे नेतृत्व करणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला. तो ३६ वर्ष व २५६ दिवसांचा आहे आणि त्याने शिखर धवनचा ( ३५ वर्ष व २३६ दिवस वि. श्रीलंका, २०२१) याचा विक्रम मोडला. 

१० अंश सेल्सिअस तापमानात भारतीय खेळाडू गारठलेले दिसले. तिसऱ्या षटकात शिवम दुबेने मिड ऑफवर इब्राहिम जादरानचा सोपा झेल टाकला. सहाव्या षटकात जादरानचा झेल हवेत उडाला होता, परंतु तिथे भारताचा क्षेत्ररक्षक उभा नव्हता. भारतीय गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये चांगला मारा केला आणि अफगाणिस्तानला ३३ धावाच करता आल्या. अक्षर पटेलने आठव्या षटकात भारताला पहिले यश मिळवून देताना रहमनुल्लाह गुरबाज ( २३) यष्टिचीत केले. रोहितने लगेच गोलंदाजीत बदल केला आणि शिवमने त्याच्या पहिल्या षटकात इब्राहिम जादरानला ( २५) रोहितकरवी झेलबाद केले. अक्षरने आणखी एक धक्का देताना पदार्पणवीर रहमत शाहचा ( ६) त्रिफळा उडवला. 

टॅग्स :रोहित शर्माभारतअफगाणिस्तानअक्षर पटेल