साऊदॅम्पट, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान : भारतीय संघाने शनिवारी अफगाणिस्तानवर विजय मिळवत गुणतालिकेत आगेकूच केली. या विजयापेक्षा अफगाणिस्तान संघाच्या लढाऊ वृत्तीचेच अधिक कौतुक झाले. कारण अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे सर्व प्लॅन्स फेल झाल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट कुणी टीकाकार म्हणत नसून भारताचा कर्णधार विराट कोहलीनेच सांगितले आहे.
भारतासारख्या दिग्गज संघाला अफगाणिस्तानसारख्या अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला खरा, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. भारताने अफगाणिस्तानपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग अफगाणिस्तानला करता आला नाही. पण अखेरच्या षटकापर्यंत मात्र त्यांनी भारताला चांगली लढत दिली.
या पराभवानंतर कोहली म्हणाला की, " अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात आमचं प्लॅनिंग अपयशी ठरलं. पण जेव्हा प्लॅनिंग यशस्वी होत नाही, तेव्हाच तुमची कसोटी असते आणि या कसोटीमध्ये आम्ही पास झालो. "
कर्णधार विराट कोहलीला दंड; अती आक्रमकपणा नडलाया सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर नियमभंगाची कारवाई झाली आहे. आयसीसी कलमाच्या पहिल्या स्तरावरील नियमाचे उल्लंघन केल्याप्रकणी कोहलीला दंड भरण्यास सांगण्यात आला आहे. त्याला त्याच्या मॅच फीमधील 25 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
विराटनं आयसीसीच्या 2.1 कलमाचे उल्लंघन केले आहे. या सामन्यात त्यानं पचांकडे वारंवार अपील केली आणि त्यामुळे त्याला हा दंड भरावा लागणार आहे. अफगाणिस्तानच्या डावातील 29व्या षटकात हा प्रकार घडला. पायचीतची अपील करताना विराट पंच अलीम दार यांच्याकडे आक्रमकपणे धावला. कोहलीनं ही चूक मान्य केली आहे.
विराट कोहलीची 27 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी हिटमॅन रोहित शर्मानं अफगाणिस्तानविरुद्ध नकोसा विक्रम नोंदवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं दमदार खेळी केली. त्याने या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा संयमाने सामना करताना अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. त्याने ऑस्ट्रेलिया ( 82) आणि पाकिस्तान ( 77) यांच्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धही अर्धशतक झळकावले. कोहलीची ही खेळी विक्रमी ठरली. 27 वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने प्रथमच सलग तीन सामन्यांत अर्धशतक करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी 1992साली मोहम्मद अझरूद्दीनने सलग तीन अर्धशतकं झळकावली होती.