साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर भारताने अफगाणिस्तानवर विजय मिळवला. भारताचा हा विश्वचषकातील पन्नासावा विजय ठरला.
विश्वचषकातील भारताचे 50 विजय
वि. झिम्बाब्वे -9वि. पाकिस्तान- 7वि. वेस्ट इंडिज- 5वि. अॉस्ट्रेलिया -4वि. केनिया-4वि. इंग्लंड -3वि. न्यूझीलंड -3वि.श्रीलंका-3वि. बांगलादेश- 2वि.आयर्लंड-2वि. नेदरलँड-2वि.द. आफ्रिका- 2वि. अफगणिस्तान, बर्म्युडा, ईस्ट आफ्रिका, नामिबिया व युएई- प्रत्येकी एक
विश्वचषकामध्ये आज अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताने अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात केली. या लढतीत मोहम्मद शमीने भेदक मारा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान, डावातील शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी 16 धावांची गरज असताना शमीने शेवटच्या तीन फलंदाजांना तंबूची वाट दाखवत हॅट्ट्रिक नोंदवली. त्याने आपल्या शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे मोहम्मद नबी, अफताब आलम आणि मुजीब उर रहमान यांना त्रिफळाबाद केले.
भारताने सामना आणि अफगाणिस्तानने मनं जिंकलीभारतासारख्या दिग्गज संघाला अफगाणिस्तानसारख्या अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला खरा, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. भारताने अफगाणिस्तानपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग अफगाणिस्तानला करता आला नाही.
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीवीरांना झटपट माघारी पाठवून अफगाणिस्तानने टीम इंडियाला कोंडीत पकडले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करून संघाला या गुंत्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकाचे शतकात रुपांतर करता आले नाही. विजय शंकरला आज मोठी खेळी करून आपले स्थान पक्कं करण्याची संधी होती, परंतु तोही अपयशी ठरला. महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी विकेट टिकवली, परंतु त्यांच्या धावांच्या गतीचा वेग संथ होता. त्यामुळे भारताला २२४ धावांपर्यंतच मजल मारता आली.
रोहित शर्मानं मिळवला नकोसा मान; अफगाणिस्तानच्या फिरकीची कमालवर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले. मुजीब उर रहमानच्या कॅरम बॉलवर रोहितचा त्रिफळा उडाला. डावाच्या पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रहमानने अप्रतिम चेंडू टाकून रोहितला अवघ्या एका धावेवर माघारी पाठवले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकीपटूंना भारतीय फलंदाजांना बाद करता आलेले नाही, परंतु अफगाणिस्तानच्या रहमानने ती कामगिरी करून दाखवली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये फिरकीपटूकडून बाद होणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे.
विराट कोहलीची 27 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरीहिटमॅन रोहित शर्मानं अफगाणिस्तानविरुद्ध नकोसा विक्रम नोंदवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं दमदार खेळी केली. त्याने या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा संयमाने सामना करताना अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. त्याने ऑस्ट्रेलिया ( 82) आणि पाकिस्तान ( 77) यांच्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धही अर्धशतक झळकावले. कोहलीची ही खेळी विक्रमी ठरली. 27 वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने प्रथमच सलग तीन सामन्यांत अर्धशतक करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी 1992साली मोहम्मद अझरूद्दीनने सलग तीन अर्धशतकं झळकावली होती.महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधवची अर्धशतकी भागीदारीकोहली बाद झाल्यानंतर धोनी आणि जाधव यांनी बराच काळ खेळपट्टीवर नांगर रोवला होता. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, यांच्या धावांची गती अत्यंत संथ होती. धोनीनं 52 चेंडूंत 28 धावा केल्या आणि त्यात केवळ तीन चौकरांचा समावेश होता. आदिल रशीदनं त्याला यष्टिचीत केले.