India vs Afghanistan T20 Match | मोहाली: भारतीय संघ आजपासून मायदेशात अफगाणिस्तानविरूद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. तब्बल १४ महिन्यांनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. विराट कोहलीचे देखील क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले आहे. पण किंग कोहली त्याच्या लेकीचा आज वाढदिवस असल्याने पहिल्या सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. यासाठी शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल ही दोन नावं चर्चेत आहेत. सलामीचा सामना मोहाली येथे होत असून या सामन्यात कर्णधार रोहित यशस्वी जैस्वालसोबत डावाची सुरूवात करू शकतो. लोकल बॉय शुबमन गिल विराट कोहलीच्या जागी खेळू शकतो. या सामन्यात तिलक वर्माला देखील संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
आजच्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, मुकेश कुमार.
ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तानचा संघ -इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमतुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह झाझाई, इब्राहिम अलिखिल, रहमत शाह, मोहम्मद नबी, एन. झादरान, के. जनात, ए. ओमरजाई, एस. अश्रफ, एम. रहमान, एफ. फारुखी, एफ. मलिक, नवीन उल हक, एन. अहमद, एम. सालेम, क्यू अहमद, गुलबदीन नईब, राशिद खान.