४ धावा, ४ विकेट्स! विराट कोहली, संजू सॅमसन 'गोल्डन डक'; भारतीय संघ संकटात

India vs Afghanistan T20I Live  (  Marathi News  ) : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात नाणेफेक ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 07:35 PM2024-01-17T19:35:40+5:302024-01-17T19:36:21+5:30

whatsapp join usJoin us
India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : 4 runs, 4 wickets! Virat Kohli, Sanju Samson 'Golden Duck';  India in trouble as they are 22/4. | ४ धावा, ४ विकेट्स! विराट कोहली, संजू सॅमसन 'गोल्डन डक'; भारतीय संघ संकटात

४ धावा, ४ विकेट्स! विराट कोहली, संजू सॅमसन 'गोल्डन डक'; भारतीय संघ संकटात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Afghanistan T20I Live  ( Marathi News ) : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करून यजमानांना कोंडीत पकडले. मागील दोन सामन्यांत भोपळ्यावर बाद होणारा रोहित शर्मा दडपणाखाली होता. त्यात विराट कोहलीसंजू सॅमसन गोल्डन डकवर बाद झाले. यशस्वी जैस्वालही काही खास करू शकला नाही आणि भारताने ४ धावांच्या फरकाने ४ विकेट्स गमावल्या. 

Video : २ भोपळे नावावर, त्यात तू...; Rohit Sharma निर्णयावर नाराज, अम्पायरला सवाल


भारताने आजच्या सामन्यात अक्षर पटेल, जितेश शर्मा व अर्शदीप सिंग यांच्याजागी संजू सॅमसन, आवेश खान व कुलदीप यादव यांना आज संधी दिली गेली आहे. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताची सुरुवात काही खास झालेली नाही. यशस्वी जैस्वाल ( ४) तिसऱ्या षटकात उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. फरीद अहदमने पुढच्याच षटकात विराट कोहलीला गोल्डन डकवर माघारी पाठवून भारताची अवस्था २ बाद १८ अशी केली. 


पहिल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद झालेला रोहित थोडा दडपणाखालीच खेळत होता. त्यात विकेट पडल्याने त्याच्यावरील दडपण वाढले. अहमदने त्याच्या दुसऱ्या षटकात दोन धक्के दिल्यानंतर अझमुल्लाह उमरझईने मोठा दणका दिला. मागील दोन सामन्यातील मॅच विनर शिवम दुबेला ( १) त्याने माघारी पाठवले. यष्टिरक्षक रहमनुल्लाह गुरबाजने अफलातून झेल घेऊन भारताचा तिसरा फलंदाज २१ धावांवर माघारी पाठवला. संजू सॅमसनला आज संधी होती, पंरतु तो पुन्हा अपयशी झाला. अहमदने त्याच्या तिसऱ्या षटकात संजूला गोल्डन डकवर झेलबाद केले. बिनबाद १८ वरून ४ बाद २२ अशी भारताची दयनीय अवस्था झाली.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३५ वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम विराटने आज नावावर केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये तो पाचव्यांदा शून्यावर बाद झाला, परंतु गोल्डन डकवर माघारी जाण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी सर्वाधिक ३४ वेळा शून्यावर बाद झाला होता.  

Web Title: India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : 4 runs, 4 wickets! Virat Kohli, Sanju Samson 'Golden Duck';  India in trouble as they are 22/4.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.