India vs Afghanistan T20I Live ( Marathi News ) : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आणखी एक ट्वेंटी-२० मालिका जिंकली आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा आजचा हा सामना हा केवळ औपचारिकता राहिला आहे. यशस्वी जैस्वाल व शिवम दुबे यांनी या मालिकेत आपली छाप पाडलेली असताना अक्षर पटेलला सूर गवसलेला दिसतोय. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अक्षर पटेल, जितेश शर्मा व अर्शदीप सिंग यांच्याजागी संजू सॅमसन, आवेश खान व कुलदीप यादव यांना आज संधी दिली गेली आहे.
अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी याने ६७ धावा केल्यास तो आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त दोन हजार धावा करणारा अफगाणिस्तानचा दुसरा फलंदाज बनेल. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त नबी ( ९८) व नजिबुल्लाह जादरान ( ९५) हे १०० षटकारांच्या उंबरठ्यावर आहेत. तेच दुसरीकडे अक्षर पटेलने १ विकेट घेताच ट्वेंटी-२० पन्नास बळी टिपणारा तो भारताचा नववा गोलंदाज बनेल. याशिवाय विराट कोहलीने ६ धावा करताना ट्वेंटी-२०त १२ हजार धावा करणारा पहिल्या भारतीयाचा मान तो पटकावणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी भारताचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना आहे आणि त्यामुळे सर्व खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न आहे. संजूचे नाव घेताच स्टेडियमवर एकच जल्लोष झाला.
अफगाणिस्तानचा संघ - इब्राहिम जादरान, रहमनुल्लाह गुरबाज, गुलबदीन नईम, अझमतुल्लाह ओमारजई, मोहम्मद नबी, अजिबुल्लाह जादरान, करिम जनत, शराफुद्दीन अश्रफ, क्वैस अहमद, मोहम्मद सलीम सफी, फरीद अहमद मलिक