अफगाणिस्तानला २ धावा फुकट दिल्या? रोहित शर्मा, विराट कोहलीने निषेध नोंदवला

India vs Afghanistan T20I Live  -  भारत-अफगाणिस्तान यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना थरारक झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:56 PM2024-01-17T22:56:20+5:302024-01-17T22:56:38+5:30

whatsapp join usJoin us
India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : India need 17 in the Super Over, : Mohammad Nabi has a word with Rohit. Kohli is signalling to the umpires how they could be permitted to claim the two extra runs  | अफगाणिस्तानला २ धावा फुकट दिल्या? रोहित शर्मा, विराट कोहलीने निषेध नोंदवला

अफगाणिस्तानला २ धावा फुकट दिल्या? रोहित शर्मा, विराट कोहलीने निषेध नोंदवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 India vs Afghanistan T20I Live  -  भारत-अफगाणिस्तान यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना थरारक झाला. सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या लढतीत कमालीची चुरस पाहायला मिळाला. भारताने ठेवलेल्या २१२ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने २१२ धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, परंतु त्यातही राडा पाहायला मिळाला.  

Image

अफगाणिस्तानचे सलामीवीर इब्राहिम जादरान ( ५०) व रहमनुल्लाह गुरबाज ( ५०)  यांनी दमदार सुरूवात करताा ९३ धावांची भागीदारी केली. कुलदीप यादवने पहिली विकेट घेतल्यानंतर  वॉशिंग्टन सुंदरने सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद नबी ( ३४) आणि गुलबदीन नईब हे भारतीय फिरकीपटूंना हाणत होते. या दोघांनी २२ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. वॉशिंग्टनने ३ षटकांत १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.  ६ चेंडूंत १९ असा आणला. मुकेश कुमारने पहिला चेंडू वाईड टाकल्यानंतर नईबने पुढचा चेंडू चौकार हाणला. नईबने षटकार खेचला आणि २ चेंडू ५ धावा असा सामना जवळ आणला. १ चेंडूंत ३ धावा असताना नईबने २ धावा घेत सामना बरोबरीत सोडवला. नईब ३३ चेंडूंत ५५ धावांवर नाबाद राहिला आणि अफगाणिस्तानच्या ६ बाद २१२ धावा झाल्या.


तत्पूर्वी,  यशस्वी जैस्वाल ( ४) व विराट कोहली ( ०), शिवम दुबे ( १) आणि संजू सॅमसन ( ०) अपयशी ठर्लयाने भारताची अवस्था ४ बाद २२ अशी झाली होती. पण, रोहित शर्मा व रिंकू सिंग यांनी पाचव्या विकेटसाठी १९० धावांची विक्रमी भागीदारी केली. रोहितने ६९ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १२१ धावा केल्या, तर रिंकूनेही ३९ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६९ धावांची वादळी खेळी केली आणि संघाला ४ बाद २१२ धावांपर्यंत पोहोचवले. 

सुपर ओव्हरचा थरार...
अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीला आला आणि गुलबदीन नईब पहिल्याच चेंडूवर रन आऊट झाला. दुसऱ्या चेंडूवर १ धावा घेत मोहम्मद नबीने गुरबाजला स्ट्राईक दिली आणि त्याने चौकार खेचला. त्यानंतर नबीने षटकार खेचला. शेवटच्या चेंडूवर ओव्हर थ्रोमुळे अफगाणिस्तानला ३ धावा मिळाल्या आणि त्यांच्या १ बाद १६ धावा झाल्या. भारताला विजयासाठी १७ धावांचे लक्ष्य दिले गेले. नबीच्या पायाला लागून चेंडू दुसरीकडे गेल्याने रोहित नाराज दिसला.

Image
मुकेश कुमारचा तो चेंडू निर्धाव होता, पण तरीही गुरबाज धाव घेण्यासाठी पळाला. संजू सॅमसनने नॉन स्ट्राईकच्या दिशेने टाकलेला चेंडू नबीच्या पायाला लागून दुसरीकडे गेला. नबीने त्याची दिशा बदलली नसल्याने अम्पायरने दोन धावा ग्राह्य धरल्या. 

 

Web Title: India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : India need 17 in the Super Over, : Mohammad Nabi has a word with Rohit. Kohli is signalling to the umpires how they could be permitted to claim the two extra runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.