India vs Afghanistan T20I Live - भारत-अफगाणिस्तान यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना थरारक झाला. सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या लढतीत कमालीची चुरस पाहायला मिळाला. भारताने ठेवलेल्या २१२ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने २१२ धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, परंतु त्यातही राडा पाहायला मिळाला.
अफगाणिस्तानचे सलामीवीर इब्राहिम जादरान ( ५०) व रहमनुल्लाह गुरबाज ( ५०) यांनी दमदार सुरूवात करताा ९३ धावांची भागीदारी केली. कुलदीप यादवने पहिली विकेट घेतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद नबी ( ३४) आणि गुलबदीन नईब हे भारतीय फिरकीपटूंना हाणत होते. या दोघांनी २२ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. वॉशिंग्टनने ३ षटकांत १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. ६ चेंडूंत १९ असा आणला. मुकेश कुमारने पहिला चेंडू वाईड टाकल्यानंतर नईबने पुढचा चेंडू चौकार हाणला. नईबने षटकार खेचला आणि २ चेंडू ५ धावा असा सामना जवळ आणला. १ चेंडूंत ३ धावा असताना नईबने २ धावा घेत सामना बरोबरीत सोडवला. नईब ३३ चेंडूंत ५५ धावांवर नाबाद राहिला आणि अफगाणिस्तानच्या ६ बाद २१२ धावा झाल्या.
तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल ( ४) व विराट कोहली ( ०), शिवम दुबे ( १) आणि संजू सॅमसन ( ०) अपयशी ठर्लयाने भारताची अवस्था ४ बाद २२ अशी झाली होती. पण, रोहित शर्मा व रिंकू सिंग यांनी पाचव्या विकेटसाठी १९० धावांची विक्रमी भागीदारी केली. रोहितने ६९ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १२१ धावा केल्या, तर रिंकूनेही ३९ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६९ धावांची वादळी खेळी केली आणि संघाला ४ बाद २१२ धावांपर्यंत पोहोचवले.
सुपर ओव्हरचा थरार...अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीला आला आणि गुलबदीन नईब पहिल्याच चेंडूवर रन आऊट झाला. दुसऱ्या चेंडूवर १ धावा घेत मोहम्मद नबीने गुरबाजला स्ट्राईक दिली आणि त्याने चौकार खेचला. त्यानंतर नबीने षटकार खेचला. शेवटच्या चेंडूवर ओव्हर थ्रोमुळे अफगाणिस्तानला ३ धावा मिळाल्या आणि त्यांच्या १ बाद १६ धावा झाल्या. भारताला विजयासाठी १७ धावांचे लक्ष्य दिले गेले. नबीच्या पायाला लागून चेंडू दुसरीकडे गेल्याने रोहित नाराज दिसला.