११ चौकार, ८ षटकार! रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; ठोकली विक्रमी सेन्चुरी, रिंकू सिंगसह 'दादागिरी'

India vs Afghanistan T20I Live  - रोहित शर्माने ( Rohit Sharma) कॅप्टन्स इनिंग्स करताना भारताचा डाव सावरला. सोबतीला रिंकू सिंग ( Rinku Singh) उभा राहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 08:43 PM2024-01-17T20:43:09+5:302024-01-17T20:46:32+5:30

whatsapp join usJoin us
India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : Rohit Sharma's ( 121*) World Record! Most 100s in T20Is, Rinku Singh ( 69*), india set 213 runs target | ११ चौकार, ८ षटकार! रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; ठोकली विक्रमी सेन्चुरी, रिंकू सिंगसह 'दादागिरी'

११ चौकार, ८ षटकार! रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; ठोकली विक्रमी सेन्चुरी, रिंकू सिंगसह 'दादागिरी'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Afghanistan T20I Live    ( Marathi News )  रोहित शर्माने ( Rohit Sharma) कॅप्टन्स इनिंग्स करताना भारताचा डाव सावरला. सोबतीला रिंकू सिंग ( Rinku Singh) उभा राहिला आणि ४ बाद २२ धावांवरून भारताने मोठा पल्ला गाठला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करून विराट कोहली व हार्दिक पांड्या यांचा ( ११३ धावा वि. पाकिस्तान, २०२२) विक्रम मोडला. विराटने ६४ चेंडूंत १०३ धावा करून ट्वेंटी-२०तील पाचवे शतक झळकावले आणि जगात असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज ठरला. 

रोहित शर्माने 'विराट' विक्रम मोडला, पण अम्पायरवर पुन्हा खवळला; जाणून घ्या का


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाच्या अंगाशी आल्याचे दिसले. यशस्वी जैस्वाल ( ४) व विराट कोहली ( ०) हे सलग दोन चेंडूंवर माघारी परतले. शिवम दुबे ( १) आज अपयशी ठरला. संजू सॅमसनला ( ०) संधीचं सोनं करण्यात पुन्हा अपयश आले. रोहित शर्मा दुसऱ्या बाजूने मैदानावर उभा राहिला आणि रिंकू सिंगला आज मोठी खेळी करण्याची संधी मिळाली.   रोहितने अर्धशतकी खेळी करून विराट कोहलीचा मोठा विक्रम आज मोडला. भारतीय कर्णधार म्हणून ट्वेंटी-२०त सर्वाधिक १५७० धावांचा विराटचा विक्रम आज रोहितने मोडला. शिवाय त्याने कर्णधार म्हणून ट्वेंटी-२०त  १३ वेळा फिफ्टी प्लस धावा करून विराटशी बरोबरी केली. 


१२ व्या षटकापासून रोहितने हात मोकळे करण्यास सुरुवात केली आणि एकामागून एक विक्रमांचा पाऊस पाडला. ट्वेंटी-२०त भारताकडून सर्वाधिक धावा करणारा कर्णधार तो ठरला. त्याने विराटचा ( १५७०) विक्रम मोडला. त्याचवेळी त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक ८७ षटकारांचा विक्रमही नावावर केला. इंग्लंडच्या इयॉन मॉर्गनचा ( ८६) विक्रम त्याने मोडला. रोहितने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पाचवे शतक झळकावले आणि सूर्यकुमार यादव ( ४) व ग्लेन मॅक्सवेल ( ४) यांना मागे टाकले. रिंकूनेही षटकाराने अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे कर्णधार म्हणून हे ट्वेंटी-२०ती तिसरे शतक ठऱले आणि त्याने बाबर आजमशी बरोबरी केली. 

रोहितने ६९ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १२१ धावा केल्या, तर रिंकूनेही ३९ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६९ धावांची वादळी खेळी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १९० धावांची भागीदारी करताना संघाला ४ बाद २१२ धावांपर्यंत पोहोचवले. 

Web Title: India vs Afghanistan T20I Live Marathi Updates : Rohit Sharma's ( 121*) World Record! Most 100s in T20Is, Rinku Singh ( 69*), india set 213 runs target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.