India vs Afghanistan T20I Live ( Marathi News ) रोहित शर्माने ( Rohit Sharma) कॅप्टन्स इनिंग्स करताना भारताचा डाव सावरला. सोबतीला रिंकू सिंग ( Rinku Singh) उभा राहिला आणि ४ बाद २२ धावांवरून भारताने मोठा पल्ला गाठला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करून विराट कोहली व हार्दिक पांड्या यांचा ( ११३ धावा वि. पाकिस्तान, २०२२) विक्रम मोडला. विराटने ६४ चेंडूंत १०३ धावा करून ट्वेंटी-२०तील पाचवे शतक झळकावले आणि जगात असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज ठरला.
रोहित शर्माने 'विराट' विक्रम मोडला, पण अम्पायरवर पुन्हा खवळला; जाणून घ्या का
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाच्या अंगाशी आल्याचे दिसले. यशस्वी जैस्वाल ( ४) व विराट कोहली ( ०) हे सलग दोन चेंडूंवर माघारी परतले. शिवम दुबे ( १) आज अपयशी ठरला. संजू सॅमसनला ( ०) संधीचं सोनं करण्यात पुन्हा अपयश आले. रोहित शर्मा दुसऱ्या बाजूने मैदानावर उभा राहिला आणि रिंकू सिंगला आज मोठी खेळी करण्याची संधी मिळाली. रोहितने अर्धशतकी खेळी करून विराट कोहलीचा मोठा विक्रम आज मोडला. भारतीय कर्णधार म्हणून ट्वेंटी-२०त सर्वाधिक १५७० धावांचा विराटचा विक्रम आज रोहितने मोडला. शिवाय त्याने कर्णधार म्हणून ट्वेंटी-२०त १३ वेळा फिफ्टी प्लस धावा करून विराटशी बरोबरी केली.
रोहितने ६९ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १२१ धावा केल्या, तर रिंकूनेही ३९ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६९ धावांची वादळी खेळी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १९० धावांची भागीदारी करताना संघाला ४ बाद २१२ धावांपर्यंत पोहोचवले.