नवी दिल्ली - भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये उद्या १४ जूनपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात ऐतिहासिक कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघातून एम.एस खेळणार आहे. चमकलात ना....? पण हे खरे आहे. हा एम.एस अफगाणिस्तानचा आहे.
अफगाणिस्तान संघातील विकेटकीपर फलंदाज मोहम्मद शहजाद भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा फॅन आहे. धोनीला तो आपला हिरो मानतो आणि स्वत:ला ‘MS’ म्हणने त्याला आवडते. मोहम्मद शहजादने क्रिकेट सुरु केल्यापासून तो धोनीचा चाहता आहे. धोनीप्रमाणे विकेटकींग, फलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करत असतो. मोहम्मद शहजादला धोनीसारखे षटकार मारुन सामना संपवायला आवडते. मोहम्मद शहजाद धोनीसारखा हेलीकॉप्टर शॉटही मारतो. धोनीचे व्हिडीओ पाहून तो त्याची नकल करत असतो. धोनीसारखे फटके, चपळ स्टपींग, मैदानावर वावर आणि देहयष्टी ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीसाठी असा असेल भारताचा संघ –अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, करुण नायर, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर, दिनेश कार्तिक, नवदीप सैनी
अफगाणिस्तान संघअसगर स्टॅनिकजई, मोहम्मद शहजाद, जावेद अहमदी, रहमत शाह, इहसानुल्लाह जनत, नासिर जमाल, हशमतुल्लाह शाहिदी, अफसर जाजाई, मोहम्मद नबी, राशिद खान, झहीर खान, आमिर हमजा होटक, सैयद अहमद शिरजाद, यामिन अहमदजाई वफादार आणि मुजिब-उर-रहमान