Join us  

Ind vs Aus 1st test live : २ चेंडू २ विकेट्स! रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाची 'वाट' लावली, केएस भरतने सुपर स्टम्पिंग केली, Video 

India vs Australia 1st test live score updates  : लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाची वाट लावली. त्याने सलग दोन चेंडूंत ऑसी फलंदाजांना बाद केले. पदार्पणवीर केएस भरतने ( KS Bharat) अप्रतिम स्टम्पिंग केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 12:47 PM

Open in App

India vs Australia 1st test live score updates  : मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी भारताला धडाकेबाज सुरुवात करून देताना ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद २ धावा अशी दयनीय केली. पण, अनुभवी स्टीव्ह स्मिथ व भारतात प्रथमच खेळणारा मार्नस लाबुशेन यांनी यजमानांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाची वाट लावली. त्याने सलग दोन चेंडूंत ऑसी फलंदाजांना बाद केले. पदार्पणवीर केएस भरतने ( KS Bharat) अप्रतिम स्टम्पिंग केली.

सूर्यकुमार यादवचा जलवा! पदार्पणातच एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम नावावर

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला ( १) पायचीत केले.  मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्यावर  DRS घ्यायचा की नाही या द्विधा मनस्थितित खेळाडू होते. १ सेकंद शिल्लक असताना रोहित शर्माने DRS घेतला अन् त्यात ख्वाजाची विकेट मिळाली. त्यानंतर मोहम्मद शमीने पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा ( १) त्रिफळा उडवला.  त्याचा भन्नाट चेंडू स्टम्प कुठच्या कुठे घेऊन गेला. ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here )   रोहितने सातव्या षटकात फिरकीपटू रवींद्र जडेजाला गोलंदाजीला आणले. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन या फलंदाजांनाही फिरकीपटूंनी अडचणीत आणले. अक्षर पटेल यालाही गोलंदाजीला आणून रोहितने ऑस्ट्रेलियाची कोंडी केली. स्मिथ व लाबुशेन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला २ बाद ७६ धावा उभारून दिल्या. स्मिथ ७४ चेंडूंत १९ आणि लाबुशेन ११० चेंडूंत ४७ धावांवर खेळत होता. पण, लंच ब्रेकनंतर लाबुशेनला २ धावाच करता आल्या. रवींद्र जडेजाच्या फिरकीवर तो यष्टीचीत झाला. भरतने यष्टींमागे सुरेख कामगिरी केली. त्यापाठोपाठ मॅट शेनशॉ LBW झाला. जडेजाची हॅटट्रिक मात्र हुकली. 

  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजास्टीव्हन स्मिथ
Open in App