Ind vs Aus 1st test live : अक्षर पटेल, मोहम्मद शमी यांनी धू धू धुतले; 'बापू'चे शतक हुकले, पण ऑस्ट्रेलियासमोर उभा केला धावांचा डोंगर

India vs Australia 1st test live score updates  : रोहित शर्माच्या  ( Rohit Sharma Century) शतकानंतर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:31 AM2023-02-11T11:31:54+5:302023-02-11T11:37:50+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 1st test live scorecard nagpur :A terrific innings from Axar Patel - 84 in 174 balls,  400 all out! India have a lead of 223 runs in the first innings. | Ind vs Aus 1st test live : अक्षर पटेल, मोहम्मद शमी यांनी धू धू धुतले; 'बापू'चे शतक हुकले, पण ऑस्ट्रेलियासमोर उभा केला धावांचा डोंगर

Ind vs Aus 1st test live : अक्षर पटेल, मोहम्मद शमी यांनी धू धू धुतले; 'बापू'चे शतक हुकले, पण ऑस्ट्रेलियासमोर उभा केला धावांचा डोंगर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 1st test live score updates  : रोहित शर्माच्या  ( Rohit Sharma Century) शतकानंतर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जडेजा माघारी परतला, परंतु त्यानंतर आलेल्या मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धू धू धुतला. शमीने नवव्या विकेटसाठी अक्षर पटेलसह ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. . त्यानंतर अक्षरने आक्रमक पवित्रा घेतला आणि संघाला चारशे धावांपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर टॉड मर्फीने १२४ धावा देताना ७ विकेट्स घेतल्या. 

रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला. त्याने आज शतक झळकावताना अनेक विक्रम मोडले. रोहितची बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला सामन्यावर पकड घेता आली असती, परंतु जडेजा-पटेल यांनी त्यांना चोपून काढले. रोहित २१२ चेंडूंत १५ चौकार व २ षटकार खेचून १२० धावांवर बाद झाला. दिवसाच्या अखेरच्या षटकात जडेजाला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथने जीवदान दिले. पण, कालच्या ६६ धावांत जडेजाला तिसऱ्या दिवशी  ४ धावांची भर घालता आली. प्रचंड  फिरकी  घेणाऱ्या खेळपट्टीवर टॉड मर्फीच्या सरळ चेंडूवर जडेजाचा त्रिफळा उडाला. जडेजाने १८५ चेंडूंत ९ चौकारांसह ७० धावा केल्या आणि अक्षरसह आठव्या विकेटसाठी २११ चेंडूंत ८८ धावा जोडल्या. 

मोहम्मद शमीचा सोपा झेल बोलंडने सोडला. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने काहीच घडत नव्हते. झेल सोडले जात होते आणि त्यात DRS वायाही  गेले. शमीनेही चांगली फटकेबाजी करून त्यांचे टेंशन वाढवले. शमीने नवव्या विकेटसाठी अक्षरसह ७६ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली आणि त्यात भारतीय गोलंदाजाने ३६ धावा चोपल्या होत्या. मर्फीच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात शमीची विकेट पडली. शमीने ४७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावा चोपल्या. अक्षर पटेल १७४ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ८४ धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव ४०० धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India vs aus 1st test live scorecard nagpur :A terrific innings from Axar Patel - 84 in 174 balls,  400 all out! India have a lead of 223 runs in the first innings.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.