Ind vs Aus 1st test live : ८ बाद ७५! भारताची सामन्यावर पकड तरी रोहित शर्मा भडकला, सूर्यकुमार खुदकन हसला, Video

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४०० धावा करून २२३ धावांची आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 01:59 PM2023-02-11T13:59:59+5:302023-02-11T14:00:17+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 1st test live scorecard nagpur :AUS 8/75; Captain Rohit scolding the production crew to show the DRS reply instead of pretty face, Video   | Ind vs Aus 1st test live : ८ बाद ७५! भारताची सामन्यावर पकड तरी रोहित शर्मा भडकला, सूर्यकुमार खुदकन हसला, Video

Ind vs Aus 1st test live : ८ बाद ७५! भारताची सामन्यावर पकड तरी रोहित शर्मा भडकला, सूर्यकुमार खुदकन हसला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 1st test live score updates  : भारतीय संघ तिसऱ्याच दिवशी नागपूर कसोटी जिंकेल असे दिसतेय. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४०० धावा करून २२३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली. आर अश्विनने ( R Ashwin) पाच विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचे ८ फलंदाज ७५  धावांत माघारी परतले. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) भडकलेला दिसला.  India vs Australia test series 

 आर अश्विनच्या 'फिरकी'वर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गार, ६४ धावांत ६ विकेट्स; 'अन्ना'चा मोठा विक्रम, Video 

रोहित शर्माच्या १२० धावांनंतर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जडेजा ( ७०) माघारी परतला.  जडेजाने अक्षरसह आठव्या विकेटसाठी २११ चेंडूंत ८८ धावा जोडल्या. त्यानंतर मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धू धू धुतला. शमीने नवव्या विकेटसाठी अक्षर पटेलसह ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर टॉड मर्फीने १२४ धावा देताना ७ विकेट्स घेतल्या. शमीने ४७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावा चोपल्या. अक्षर पटेल १७४ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ८४ धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव ४०० धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतली.  ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here ) 



दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची पडझड सुरूच राहिली. आर अश्विनने दुसऱ्याच षटकात उस्मान ख्वाजाला माघारी पाठवले, विराट कोहलीने स्लीपमध्ये चांगला झेल टिपला. त्यानंतर रवींद्र अश्विनने कसोटीतील नंबर वन फलंदाज मार्नस लाबुशेनला पायचीत केले. अश्विन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटूने बाजी मारली. अश्विनने आणखी दोन विकेट्स घेताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ४२ अशी केली. मॅट रेनशॉ दोन धावांवर पायचीत झाला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत अश्विन (९७) दुसऱ्या स्थआनावर आला. त्याने हरभजन सिंग व नॅथन लियॉन  ( ९५) यांचा विक्रम मोडला. अनिल कुंबळे १११ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. अश्विनने ३१वेळा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.  
 


रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का देताना कर्णधार पॅट कमिन्सला बाद केले. यष्टिरक्षक केएस भरतने सुरेख झेल टिपला. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये १०० विकेट्स या LBW  म्हणून घेतल्या आहेत आणि तो वेगळ्या क्लबमध्ये सहभागी झाला. भारताच्या अनिल कुंबळेने १५६ LBW विकेट्स घेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर मुथय्या मुरलीधरन ( १५०), शेन वॉर्न ( १३८) व रंगना हेरथ ( १०८) यांचा क्रमांक येतो. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने DRS घेतल्यानंतर कॅमेरामनने कॅमेरा रोहितकडे वळवला. तेव्हा रोहितने कॅमेरामनला  सुनावले अन् हे पाहून मागे उभा असलेला सुर्यकुमार यादव हसू लागला. ऑस्ट्रेलियाचे ८ फलंदाज माघारी परतले आहेत. 




  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: India vs aus 1st test live scorecard nagpur :AUS 8/75; Captain Rohit scolding the production crew to show the DRS reply instead of pretty face, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.