Ind vs Aus 1st test live : पहिल्या सत्रात तुल्यबळ लढत! भारताच्या आक्रमणाला ऑस्ट्रेलियाकडून प्रत्युत्तर; स्मिथ-लाबुशेनची सावध खेळी 

India vs Australia 1st test live score updates  : मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी भारताला धडाकेबाज सुरुवात करून देताना ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद २ धावा अशी दयनीय केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 11:39 AM2023-02-09T11:39:41+5:302023-02-09T11:40:03+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 1st test live scorecard nagpur : Australia 76/2 on Day 1 Lunch - a good session for both the teams, India got two early wickets, but then Smith and Labuschagne took the charge.  | Ind vs Aus 1st test live : पहिल्या सत्रात तुल्यबळ लढत! भारताच्या आक्रमणाला ऑस्ट्रेलियाकडून प्रत्युत्तर; स्मिथ-लाबुशेनची सावध खेळी 

Ind vs Aus 1st test live : पहिल्या सत्रात तुल्यबळ लढत! भारताच्या आक्रमणाला ऑस्ट्रेलियाकडून प्रत्युत्तर; स्मिथ-लाबुशेनची सावध खेळी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 1st test live score updates  : मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी भारताला धडाकेबाज सुरुवात करून देताना ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद २ धावा अशी दयनीय केली. पण, अनुभवी स्टीव्ह स्मिथ व भारतात प्रथमच खेळणारा मार्नस लाबुशेन यांनी यजमानांना चोख प्रत्युत्तर दिले. 

सूर्यकुमार यादवचा जलवा! पदार्पणातच एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम नावावर

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून आज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व केएस भरत ( KS Bharat) यांनी पदार्पण केले आहे. भारताकडून क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये वयाच्या तीशीनंतर पदार्पण करणारा सूर्यकुमार यादव हा पहिला खेळाडू ठरला. त्याने १४ मार्च २०२१ मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३० वर्ष व १८१ दिवसांचा असताना, १८ जुलै २०२१ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये ३० वर्ष व ३०७ दिवसांचा असताना पदार्पण केले होते. आज  तो ३२ वर्ष व १४८ दिवसांचा आहे आणि कसोटीत पदार्पण केले आहे. ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here ) 

मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला ( १) पायचीत केले.  मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्यावर  DRS घ्यायचा की नाही या द्विधा मनस्थितित खेळाडू होते. १ सेकंद शिल्लक असताना रोहित शर्माने DRS घेतला अन् त्यात ख्वाजाची विकेट मिळाली. त्यानंतर मोहम्मद शमीने पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा ( १) त्रिफळा उडवला.  त्याचा भन्नाट चेंडू स्टम्प कुठच्या कुठे घेऊन गेला.
 


रोहितने सातव्या षटकात फिरकीपटू रवींद्र जडेजाला गोलंदाजीला आणले. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन या फलंदाजांनाही फिरकीपटूंनी अडचणीत आणले. अक्षर पटेल यालाही गोलंदाजीला आणून रोहितने ऑस्ट्रेलियाची कोंडी केली. स्मिथ व लाबुशेन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला २ बाद ७६ धावा उभारून दिल्या. स्मिथ ७४ चेंडूंत १९ आणि लाबुशेन ११० चेंडूंत ४७ धावांवर खेळतोय. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: India vs aus 1st test live scorecard nagpur : Australia 76/2 on Day 1 Lunch - a good session for both the teams, India got two early wickets, but then Smith and Labuschagne took the charge. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.