India vs Australia 1st test live score updates : नागपूर कसोटीचा पहिला दिवस भारतीयांच्या नावावर राहिला. गुडघ्यावरील शस्त्रक्रीयेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja five wickets) घेतल्या. आर अश्विनने ( R Ashwin) तीन विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली अन् कसोटीत ४५०+ विकेट्सचा टप्पा ओलांडणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर रोहित शर्माने अर्धशतक झळकावून ऑस्ट्रेलियाचे टेंशन वाढवले. लोकेश राहुलची त्याला संयमी साथ मिळाली.
रवींद्र जडेजाची 'भारी' खेळी, काही कळण्याआधी स्टीव्ह स्मिथची गुल झाली 'दांडी', Video
भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या सत्रात चांगले कमबॅक केले. रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) पाच विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले आणि त्यात अनुभवी आर अश्विन ( R Ashwin) यानेही ३ विकेट्स घेतल्या. सप्टेंबर महिन्यात गुडघ्यावर सर्जरी झाल्यानंतर जडेजा क्रिकेटपासून दूर होता आणि फेब्रुवारीत पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या.जडेजाने ४७ धावांत ५, तर अश्विनने ४२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. India vs Australia test series
ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेन ( ४९), स्टीव्ह स्मिथ ( ३७), पीटर हँड्सकोम्ब ( ३१) व अॅलेक्स केरी ( ३६) यांनी संघर्ष दाखवला. उस्मान ख्वाजा व डेव्हिड वॉर्नर पहिल्या तीन षटकांत माघारी परतल्यानंतर स्मिथ व लाबुशेन यांनी ८२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. पण, जडेजाने मॅच फिरवली. लंच ब्रेकनंतर जडेजाने ४ विकेट्स घेतल्या आणि चहापानानंतर अश्विनने तीन विकेट्स घेऊन ऑसींचा डाव १७७ धावांवर गुंडाळला. केरीची विकेट अश्विनची ही कसोटी क्रिकेटमधील ४५० वी विकेट ठरली. अनिल कुंबळे यांच्यानंतर इतक्या विकेट घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. India vs Australia test series , Ind vs aus scorecardरोहित शर्माने डावाची सुरुवात आक्रमक फटकेबाजीने केली. त्याने पहिल्या षटकात तीन चौकार खेचले. नॅथन लियॉनने पुढे येत षटकार खेचून त्याने कसोटीतील २५०वा सिक्स मारला. रोहित व लोकेश यांनी २३ षटकं खेळून काढताना ७६ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला ८ चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट मिळवली. पदार्पणवीर टॉड मर्फीने स्वतःच्याच गोलंदाजीवर लोकेश राहुलची ( २०) विकेट घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ७७ धावा केल्या आणि १०० धावांनी ते अजूनही पिछाडीवर आहेत. रोहित ६९ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ५६ धावांवर नाबाद आहे. Ind vs aus scorecard, Ind vs aus live match
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"