India vs Australia 1st test live score updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानावर खेळवला जात आहे. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आणि त्यांच्या एका खेळाडूला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १७७ धावांत ऑलआऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची स्थिती या सामन्यात दयनीय दिसत आहे. त्याचवेळी फलंदाज मॅट रेनशॉ स्कॅनसाठी रुग्णालयात गेला आहे.
मजबूत स्थितीतही भारतीय संघ गोंधळला; विराटमुळे रोहित शर्मा बाद होता होता वाचला, कॅप्टनने जाब विचारला
नागपूर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज रेनशॉ वॉर्म अप करत होता . त्यानंतर त्यांच्या गुडघ्यात अचानक दुखू लागले आणि अहवालानुसार त्यांना नागपूर येथील रुग्णालयात स्कॅनसाठी नेण्यात आले आहे. रेनशॉच्या गुडघ्याला सूज आली आहे आणि त्यामुळेच तो क्षेत्ररक्षणालाही उतरला नाही. त्याचवेळी रेनशॉच्या जागी अॅश्टन एगर क्षेत्ररक्षणासाठी आला. आता जर रेनशॉची समस्या लवकर दूर झाली नाही तर तो ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसू शकतो.