Join us  

Ind vs Aus 1st test live : नागपूर कसोटीदरम्यान भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी; स्टार खेळाडूची संपूर्ण मालिकेतून माघार 

India vs Australia 1st test live score updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:32 AM

Open in App

India vs Australia 1st test live score updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या  पहिल्या कसोटीत भारताचे वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीत दमदार फटकेबाजी सुरू ठेवली आहे. यादरम्यान भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या संपूर्ण बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट संघासाठी हा मोठा धक्का आहे.  Ind vs aus scorecard, Ind vs aus live  match

रवींद्र जडेजा अडचणीत? Viral Video नंतर मॅच रेफरींकडून चौकशी, रोहित शर्माकडेही विचारणा 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत या मॅचविनरची अनुपस्थिती भारतीय संघाला धक्का देणारी आहे. टेलीग्राफ या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्येही खेळू शकणार नाही. बीसीसीआय बुमराहला खेळवण्याची घाई करण्याच्या मनस्थितीत नाही. आगामी वन डे वर्ल्ड कप लक्षात घेता BCCI ला त्याच्याबाबत पुन्हा कोणताही धोका पत्करायचा नाही. ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here ) 

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आधीच बाहेर झाला होता. पण आता तो बॉर्डर गावस्कर मालिकेच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. BCCIने अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. Ind vs aus scorecard

जसप्रीत बुमराहच्या चाहत्यांची इच्छा आहे की त्याने आयपीएल २०२३ पूर्वी भारतासाठी किमान दोन कसोटी सामने खेळावे, परंतु याची शक्यता फारच कमी दिसते. बुमराहच्या अनुपस्थितीत संपूर्ण जबाबदारी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्यावर येईल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या ८-९ महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. जसप्रीत बुमराहने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेत खेळला होता. तेव्हाही बीसीसीआयने त्याला खेळवण्याची घाई केली होती आणि त्यानंतर त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागली होती. Ind vs aus scorecard, Ind vs aus live  match

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजसप्रित बुमराहबीसीसीआय
Open in App