India vs Australia 1st test live score updates : रोहित शर्मा आणि आर अश्विन यांनी भारताच्या डावाला आकार दिला. नाईट वॉचमन म्हणून आलेला अश्विन चांगला खेळला, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. दुसऱ्या दिवस दीड तास रोहितसह उभा राहिल्यानंतर अश्विनची विकेट पडली. पदार्पणवीर टॉड मर्फीने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताला दोन धक्के दिले. विराट कोहलीच्या घाईमुळे भारताला तिसरा अन् मोठा धक्का बसला असता, पण...
नागपूर कसोटीदरम्यान भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी; स्टार खेळाडूची संपूर्ण मालिकेतून माघार
रवींद्र जडेजाच्या पाच आणि आर अश्विनच्या तीन विकेट्सच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात रोहित शर्माने डावाची सुरुवात आक्रमक फटकेबाजीने केली. त्याने पहिल्या षटकात तीन चौकार खेचले. नॅथन लियॉनने पुढे येत षटकार खेचून त्याने कसोटीतील २५०वा सिक्स मारला. रोहित व लोकेश यांनी २३ षटकं खेळून काढताना ७६ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला ८ चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट मिळवली. पदार्पणवीर टॉड मर्फीने स्वतःच्याच गोलंदाजीवर लोकेश राहुलची ( २०) विकेट घेतली. Ind vs aus scorecard, Ind vs aus live match
त्यानंतर आर अश्विनला नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आले आणि फिरकीपटूने फलंदाजीत रोहितला दमदार साथ दिली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या दीड तासांत या जोडीने ऑसी गोलंदाजांना सतावले. टॉड मर्फीने १०४ चेंडूंत ४२ धावांची ही भागीदारी संपुष्टात आणली. ६२ चेंडूंत २३ धावा ( २ चौकार व १ षटकार) करणाऱ्या अश्विनला त्याने पायचीत केले. चेतेश्वर पुजारा आज आक्रमक पवित्र्यात दिसला. पण, मर्फीच्या चुकीच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो ७ धावांवर बाद झाला. ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here )
विराट कोहली व रोहित शर्मा खेळत आहेत. नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर विराटने आधी धाव घेण्यासाठी साद घातली, परंतु ऑसी खेळाडू चेंडूकडे झेपावल्याचे पाहून त्याने रोहितला माघारी पाठवले. हा थ्रो डायरेक्ट असता तर रोहित रन आऊट झाला असता. त्यानंतर रोहितने विराटकडे जाऊन जरा सांभाळून असे मस्करीत म्हटले. Ind vs aus scorecard
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"