India vs Australia 1st test live score updates : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma Century) शतकानंतर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जडेजा माघारी परतला, परंतु त्यानंतर आलेल्या मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धू धू धुतला. शमीने नवव्या विकेटसाठी अक्षर पटेलसह ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अक्षरने आक्रमक पवित्रा घेतला आणि संघाला चारशे धावांपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर टॉड मर्फीने १२४ धावा देताना ७ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमीने ३७ धावांची खेळी करताना विराट कोहली, रवी शास्त्री, युवराज सिंग यासारख्या स्टार फलंदाजांना मागे टाकणारा विक्रम नावावर केला. India vs Australia test series
रोहित २१२ चेंडूंत १५ चौकार व २ षटकार खेचून १२० धावांवर बाद झाला. दिवसाच्या अखेरच्या षटकात जडेजाला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथने जीवदान दिले. पण, कालच्या ६६ धावांत जडेजाला तिसऱ्या दिवशी ४ धावांची भर घालता आली. प्रचंड फिरकी घेणाऱ्या खेळपट्टीवर टॉड मर्फीच्या सरळ चेंडूवर जडेजाचा त्रिफळा उडाला. जडेजाने १८५ चेंडूंत ९ चौकारांसह ७० धावा केल्या आणि अक्षरसह आठव्या विकेटसाठी २११ चेंडूंत ८८ धावा जोडल्या. मोहम्मद शमीचा सोपा झेल बोलंडने सोडला. ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here )
ऑस्ट्रेलियाच्या बाजूने काहीच घडत नव्हते. झेल सोडले जात होते आणि त्यात DRS वायाही गेले. शमीनेही चांगली फटकेबाजी करून त्यांचे टेंशन वाढवले. शमीने नवव्या विकेटसाठी अक्षरसह ७६ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली आणि त्यात भारतीय गोलंदाजाने ३६ धावा चोपल्या होत्या. मर्फीच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात शमीची विकेट पडली. शमीने ४७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावा चोपल्या. अक्षर पटेल १७४ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ८४ धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव ४०० धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतली. Ind vs aus live match
भारताकडून कसोटीत मोहम्मद शमीने २५ षटकार खेचले आहेत, जे विराट कोहली ( २४), रवी शास्त्री ( २२) ,युवराज सिंग ( २२) , उमेश यादव ( २२), राहुल द्रविड ( २१), मोहम्मद अझरुद्दीन ( १९), कृष्णमाचारी श्रीकांत ( १९), इरफान पठाण ( १८), लोकेश राहुल ( १७), चेतेश्वर पुजारा ( १५), शिखर धवन ( १२) यांच्यापेक्षा जास्त आहेत. Ind vs aus scorecard
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India vs aus 1st test live scorecard nagpur : Mohammed Shami has more test sixes than Virat kohli, Ravi Shastri, Yuvraj Singh and Umesh Yadav
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.