Join us  

Ind vs Aus 1st test live : २ धावा २ विकेट! मोहम्मद सिराज अन् मोहम्मद शमीचा भेदक मारा; वॉर्नरचा उडाला त्रिफळा, Video 

India vs Australia 1st test live score updates  : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 9:57 AM

Open in App

 India vs Australia 1st test live score updates  : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  भारतीय संघाकडून आज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व केएस भरत ( KS Bharat) यांनी पदार्पण केले आहे. यावेळी बीसीसीआयने नवा पायंडा घातला अन् त्यांच्या त्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली. मोहम्मद शमी ( Mohammed Shami )  व  मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj  )या भारतीय गोलंदाजांनी पहिल्या तीन षटकांतच  ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले.   India vs Australia test series 

२०१७नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. तेव्हा भारताने चुरसीच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात २०१८-१९ व २०२०-२१ झालेल्या  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने दोन्ही वेळेस २-१ अशी मालिका जिंकून इतिहास रचला. नागपूरच्या VCA स्टेडियमवर कसोटी पदार्पण करणाऱ्या यादीत सूर्यकुमार व भरत यांचे नाव समाविष्ट झाले आहे. यापूर्वी मुरली विजय ( वि. ऑस्ट्रेलिया, २००८),  एस बद्रीनाथ ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१०), वृद्धीमान सहा ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१०) आणि रवींद्र जडेजा ( वि. इंग्लंड, २०१२) यांनी येथे पदार्पण केले होते.  ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here ) 

सूर्या व भरत यांना पदार्पणाची कॅप देत असताना बीसीसीआयने त्यांच्या कुटुंबियांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी दिली. आपल्या कुटुंबियांसमोर हा अविस्मरणीत क्षण अनुभवताना दोन्ही खेळाडू इमोशनल झाले होते. मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला ( १) पायचीत केले.   मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्यावर  DRS घ्यायचा की नाही या द्विधा मनस्थितित खेळाडू होते. १ सेकंद शिल्लक असताना रोहित शर्माने DRS घेतला अन् त्यात ख्वाजाची विकेट मिळाली. त्यानंतर मोहम्मद शमीने पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा ( १) त्रिफळा उडवला.  त्याचा भन्नाट चेंडू स्टम्प कुठच्या कुठे घेऊन गेला.  Ind vs aus 1st test match live score

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद शामीमोहम्मद सिराजडेव्हिड वॉर्नर
Open in App