Ind vs Aus 1st test live : सूर्यकुमार, भरत झाले Emotional! राहुल द्रविडनं जिंकली मनं, BCCIच्या 'त्या' एका कृतीचं होतंय कौतुक, Video 

India vs Australia 1st test live score updates  : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 09:33 AM2023-02-09T09:33:06+5:302023-02-09T09:35:01+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 1st test live scorecard nagpur : Nice gesture by BCCI, Suryakumar Yadav and KS Bharath's families invited inside the ground for Test cap ceremony, Coach Rahul Dravid meets both players' family members, Video    | Ind vs Aus 1st test live : सूर्यकुमार, भरत झाले Emotional! राहुल द्रविडनं जिंकली मनं, BCCIच्या 'त्या' एका कृतीचं होतंय कौतुक, Video 

Ind vs Aus 1st test live : सूर्यकुमार, भरत झाले Emotional! राहुल द्रविडनं जिंकली मनं, BCCIच्या 'त्या' एका कृतीचं होतंय कौतुक, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 1st test live score updates  : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  ही मालिका जिंकून आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा पक्की करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. त्याचसोबत भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावता येणार आहे. भारतीय संघाकडून आज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व केएस भरत ( KS Bharat) यांनी पदार्पण केले आहे. यावेळी बीसीसीआयने नवा पायंडा घातला अन् त्यांच्या त्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली. India vs Australia test series 

२०१७नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. तेव्हा भारताने चुरसीच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात २०१८-१९ व २०२०-२१ झालेल्या  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने दोन्ही वेळेस २-१ अशी मालिका जिंकून इतिहास रचला. सूर्यकुमार यादव व केएस भरत यांचे आज पदार्पण होत आहे. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू टॉड मर्फी आज पदार्पण करतोय. ट्रॅव्हीस हेडला ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवल्याचा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here ) 

२०१३ पासून भारताची घरच्या मैदानावर कसोटीतील जय-परायजाची आकडेवारी ही १७-० अशी राहिली आहे.  
नागपूरच्या VCA स्टेडियमवर कसोटी पदार्पण करणाऱ्या यादीत सूर्यकुमार व भरत यांचे नाव समाविष्ट झाले आहे. यापूर्वी मुरली विजय ( वि. ऑस्ट्रेलिया, २००८),  एस बद्रीनाथ ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१०), वृद्धीमान सहा ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१०) आणि रवींद्र जडेजा ( वि. इंग्लंड, २०१२) यांनी येथे पदार्पण केले होते. सूर्या व भरत यांना पदार्पणाची कॅप देत असताना बीसीसीआयने त्यांच्या कुटुंबियांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी दिली. आपल्या कुटुंबियांसमोर हा अविस्मरणीत क्षण अनुभवताना दोन्ही खेळाडू इमोशनल झाले होते. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही दोन्ही खेळाडूंच्या कुटुंबियांची भेट घेतली अन् हस्तांदोलन करून त्यांचेही अभिनंदन केले. Ind vs aus 1st test match live score




भारताची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली,  सूर्यकुमार यादव, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल.  मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: India vs aus 1st test live scorecard nagpur : Nice gesture by BCCI, Suryakumar Yadav and KS Bharath's families invited inside the ground for Test cap ceremony, Coach Rahul Dravid meets both players' family members, Video   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.