India vs Australia 1st test live score updates : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid Celebration) हा अतिशय शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. मैदानावर असो वा मैदानाबाहेर, द्रविड कधीच आक्रमक दिसला नाही. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यात द्रविडचे एक रूप दिसले जे फार कमी वेळा पाहिले गेले आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा ही जोडी ओपनिंगसाठी आली.दोघांनीही मोहम्मद शमीचे पहिले षटक सावधपणे खेळले. मात्र मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्याच षटकातच धक्का दिला.
रवींद्र जडेजा, आर अश्विनने फिरकीवर कांगारूंना नाचवले; त्यानंतर रोहित शर्माने धू धू धुतले
सिराज ओव्हर टाकायला आला तेव्हा तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करत होता. त्याने टाकलेला चेंडू सरळ जाऊन ख्वाजाच्या पॅडला लागला. ख्वाजा वाईटरित्या अडकला आणि सिराजने अपील केले. अंपायरने नॉट आऊट दिले पण रोहितने रिव्ह्यू घेतला. रोहितचा रिव्ह्यू योग्य ठरला. तिसऱ्या अंपायरने पाहिले की चेंडू सरळ रेषेत होता आणि स्टंपला लागला होता. शेवटी अंपायरने त्याला बाद केले आणि ख्वाजाला स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
या दरम्यान, कॅमेरा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडे गेला. विकेट पडल्यानंतर द्रविडने उत्साहात आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, द्रविडचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि अनेक लोक या व्हिडिओची तुलना क्रेडच्या इंदिरानगरचा गुंडा या जाहिरातीशी करत आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १७७ धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्माने डावाची सुरुवात आक्रमक फटकेबाजीने केली. त्याने पहिल्या षटकात तीन चौकार खेचले. नॅथन लियॉनने पुढे येत षटकार खेचून त्याने कसोटीतील २५०वा सिक्स मारला. रोहित व लोकेश यांनी २३ षटकं खेळून काढताना ७६ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला ८ चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट मिळवली. पदार्पणवीर टॉड मर्फीने स्वतःच्याच गोलंदाजीवर लोकेश राहुलची ( २०) विकेट घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ७७ धावा केल्या आणि १०० धावांनी ते अजूनही पिछाडीवर आहेत. रोहित ६९ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ५६ धावांवर नाबाद आहे. Ind vs aus scorecard, Ind vs aus live match
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"