Ind vs Aus 1st test live : आर अश्विनच्या 'फिरकी'वर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गार, ६४ धावांत ६ विकेट्स; 'अन्ना'चा मोठा विक्रम, Video 

India vs Australia 1st test live score updates  : भारतीय संघ तिसऱ्याच दिवशी नागपूर कसोटी जिंकेल असे दिसतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 01:31 PM2023-02-11T13:31:56+5:302023-02-11T13:38:30+5:30

whatsapp join usJoin us
India vs aus 1st test live scorecard nagpur : Ravi Ashwin overtakes Harbhajan Singh for the 2nd most wickets in BGT history as an Indian, Australia in tatters, half the side back with 52 on board  | Ind vs Aus 1st test live : आर अश्विनच्या 'फिरकी'वर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गार, ६४ धावांत ६ विकेट्स; 'अन्ना'चा मोठा विक्रम, Video 

Ind vs Aus 1st test live : आर अश्विनच्या 'फिरकी'वर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गार, ६४ धावांत ६ विकेट्स; 'अन्ना'चा मोठा विक्रम, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 1st test live score updates  : भारतीय संघ तिसऱ्याच दिवशी नागपूर कसोटी जिंकेल असे दिसतेय. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४०० धावा करून २२३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली. आर अश्विनने ( R Ashwin) ९ षटकांत चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ५२ धावांत माघारी पाठवला आहे. India vs Australia test series 

रोहित शर्माच्या शतकानंतर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. रोहित २१२ चेंडूंत १५ चौकार व २ षटकार खेचून १२० धावांवर बाद झाला.  तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जडेजा माघारी परतला, परंतु त्यानंतर आलेल्या मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धू धू धुतला. शमीने नवव्या विकेटसाठी अक्षर पटेलसह ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अक्षरने आक्रमक पवित्रा घेतला आणि संघाला चारशे धावांपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर टॉड मर्फीने १२४ धावा देताना ७ विकेट्स घेतल्या.  ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here ) 

जडेजाने १८५ चेंडूंत ९ चौकारांसह ७० धावा केल्या आणि अक्षरसह आठव्या विकेटसाठी २११ चेंडूंत ८८ धावा जोडल्या.  शमीने नवव्या विकेटसाठी अक्षरसह ७६ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली आणि त्यात भारतीय गोलंदाजाने ३६ धावा चोपल्या होत्या. मर्फीच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात शमीची विकेट पडली. शमीने ४७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावा चोपल्या. अक्षर पटेल १७४ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ८४ धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव ४०० धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतली.  Ind vs aus live  match

दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची पडझड सुरूच राहिली. आर अश्विनने दुसऱ्याच षटकात उस्मान ख्वाजाला माघारी पाठवले, विराट कोहलीने स्लीपमध्ये चांगला झेल टिपला. त्यानंतर रवींद्र अश्विनने कसोटीतील नंबर वन फलंदाज मार्नस लाबुशेनला पायचीत केले. अश्विन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटूने बाजी मारली. अश्विनने आणखी दोन विकेट्स घेताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ४२ अशी केली. मॅट रेनशॉ दोन धावांवर पायचीत झाला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत अश्विनने ( ९५) हरभजन सिंग व नॅथन लियॉन यांच्याशी बरोबरी केली. अनिल कुंबळे १११ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. अश्विनने त्यानंतर दोन विकेट्स घेतल्या आणि डावात पाच विकेट्स पूर्ण करताना भज्जीला मागे टाकले. ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज ६४ धावांत माघारी प रतले. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: India vs aus 1st test live scorecard nagpur : Ravi Ashwin overtakes Harbhajan Singh for the 2nd most wickets in BGT history as an Indian, Australia in tatters, half the side back with 52 on board 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.