India vs Australia 1st test live score updates : भारतीय संघाने नागपूर कसोटीच्या दुसऱ्या सत्रात चांगले कमबॅक केले. रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले आणि त्यात अनुभवी आर अश्विन ( R Ashwin) यानेही दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मात्र धावांचा ओघ कमी होऊ न दिल्याने रोहित शर्मा चिंतीत दिसला. अश्विन दोन विकेट्स घेऊन आशियात 'ग्रेट' ठरला.
सूर्यकुमार, भरत झाले Emotional! राहुल द्रविडनं जिंकली मनं, BCCIच्या 'त्या' एका कृतीचं होतंय कौतुक
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला ( १) पायचीत केले. मोहम्मद शमीने पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा ( १) त्रिफळा उडवला. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी ऑसींचा डाव सारवला. स्मिथ व लाबुशेन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला २ बाद ७६ धावा उभारून दिल्या. स्मिथ ७४ चेंडूंत १९ आणि लाबुशेन ११० चेंडूंत ४७ धावांवर खेळत होता. ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here ) पण, लंच ब्रेकनंतर लाबुशेनला २ धावाच करता आल्या. रवींद्र जडेजाच्या फिरकीवर तो यष्टीचीत झाला. भरतने यष्टींमागे सुरेख कामगिरी केली. त्यापाठोपाठ मॅट शेनशॉ LBW झाला. जडेजाची हॅटट्रिक मात्र हुकली. स्मिथने अचानक आक्रमक खेळ सुरू केला आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर चांगले फटके खेचले. स्मिथ फिरकी चेंडूला चांगलं खेळताना दिसल्याने जडेजाने डाव खेळला. त्याने वळणारा चेंडू न टाकता सरळ टाकला. चेंडू वळेल या आशेवर स्मिथ फटका मारायला गेला अन् बॅट-पॅडमधून चेंडू सरळ यष्टींवर आदळला. स्मिथ १०७ चेंडूंत ३७ धावा करून माघारी परतला आणि ऑस्ट्रेलियाच्या ५ बाद १०९ धावा झाल्या. अॅलेक्स केरी रिव्हर्स स्वीप मारून भारताला हैराण करत होता, परंतु अश्विनने त्याला जाळ्यात अडकवले अन् त्रिफळा उडवला. अश्विनची ही कसोटी क्रिकेटमधील ४५० वी विकेट ठरली. अनिल कुंबळे यांच्यानंतर इतक्या विकेट घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. कुंबळेने १३२ सामन्यांत ६१९ विकेट्स घेतल्या आहेत, तर अश्विनने ८९ सामन्यांत ४५०* आणि कपिल देव यांनी १३१ सामन्यांत ४३४ विकेट्स घेतल्या आहेत. सर्वात कमी सामन्यांत ४५०+ विकेट्स घेणाऱ्या विक्रमात अश्विनने कुंबळेला मागे टाकले. श्रीलंकेचा ग्रेट मुथय्या मुरलीधरन ( ८० सामने) या विक्रमात अव्वल आहे. या सर्वांपलिकडे कसोटी क्रिकेटमध्ये ३०००+ धावा आणि ४५०+ विकेट्स घेणारा अश्विन हा आशियातील एकमेव खेळाडू आहे. अश्विनने पॅट कमिन्सलाही माघारी पाठवले आणि ऑस्ट्रेलियाच्या ८ बाद १७४ धावा झाल्या आहेत. India vs Australia test series , Ind vs aus scorecard
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"