India vs Australia 1st test live score updates : मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद २ धावा अशी दयनीय केली. पण, अनुभवी स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी यजमानांना चोख प्रत्युत्तर दिले. लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाची वाट लावली. त्याने सलग दोन चेंडूंत ऑसी फलंदाजांना बाद केले. पदार्पणवीर केएस भरतने ( KS Bharat) अप्रतिम स्टम्पिंग केली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथला एका अप्रतिम चेंडूवर जडेजाने त्रिफळाचीत करून माघारी पाठवले.
२ चेंडू २ विकेट्स! रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाची 'वाट' लावली, केएस भरतने सुपर स्टम्पिंग केली, Video
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या नागपूर कसोटीत पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला ( १) पायचीत केले. मोहम्मद शमीने पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा ( १) त्रिफळा उडवला. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी ऑसींचा डाव सारवला. स्मिथ व लाबुशेन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला २ बाद ७६ धावा उभारून दिल्या. स्मिथ ७४ चेंडूंत १९ आणि लाबुशेन ११० चेंडूंत ४७ धावांवर खेळत होता. ( IND vs AUS 1st Test Live Scorecard, Click here )
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"